गोरखपूर
Appearance
गोरखपूर | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
गोरखनाथ मठ |
|
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | गोरखपूर जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ६,७३,४४६ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
गोरखपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व गोरखपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोरखपूर शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ वसले असून ते लखनौच्या २७० किमी पूर्वेस, अलाहाबादच्या २७० किमी ईशान्येस तर पाटण्याच्या २८० किमी वायव्येस आहे. गोरखपूर प्रामुख्याने येथील गोरखनाथ मठासाठी ओळखले जाते.
वाहतूक
[संपादन]गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या १०० सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून ते उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे.
प्रसिद्ध रहिवासी
[संपादन]- मुन्शी प्रेमचंद
- नरेंद्र हिरवाणी, माजी भारतीय फिरकी गोलंदाज
- अनुराग कश्यप, बॉलिवूड दिग्दर्शक
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत