भोपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?भोपाळ
मध्य प्रदेश • भारत
—  राजधानी  —

२३° १५′ ००″ N, ७७° २५′ १२″ E

गुणक: 23°15′N 77°25′E / 23.25°N 77.42°E / 23.25; 77.42
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३०८.१४ चौ. किमी
• ४२७ मी
जिल्हा भोपाळ
लोकसंख्या
घनता
१४,८२,७१८ (२००१)
• १६०/किमी
महापौर सुनिल सुद
आयुक्त निकुंज श्रीवास्तव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

त्रुटि: "462 001" अयोग्य अंक आहे
• +०७५५
• INBHO
• MP-04
संकेतस्थळ: भोपाळ महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 23°15′N 77°25′E / 23.25°N 77.42°E / 23.25; 77.42

भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.

इतिहास[संपादन]

भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेंव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली.

गोळघर

दळणवळण[संपादन]

भोपाळ देशातील बर्‍याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.

आगगाडी[संपादन]

विमानसेवा[संपादन]

भोपाळ विमानतळापासून मुंबईदिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.

भूमार्ग[संपादन]

कुशाभाऊ ठाकरे आंतरराज्यीय बस अड्डा (संपूर्ण दृश्य)

विशेष[संपादन]

३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादि स्वरूपांमध्ये शिल्लक आहे.

पर्यटन[संपादन]

भोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • वनविहार : मोकळ्या जागेत राहणारे जंगली प्राणी आणि पक्षी पहाता येतील असे ठिकाण
 • भोपाळच्या नबाबांचे वाडे/राजवाडे/महाल
 • सैरसपाटा (एक उत्तम निगा राखलेले उद्यान)
 • कालियासोत, केरवा, भदभदा आणि इतर दोन-तीन धरणे
 • भोपाळचा बडा तलाव (आणि छोटा तलाव)
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आणि इतर ३-४ संग्रहालये
 • मोती मशीद आणि इतर ३-४ मशिदी
 • भारत भवन, वगैरे.


भोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणे[संपादन]

 • सांचीचा स्तूप (भोपाळपासून ४५ किलोमीटरवर)
 • विदिशा (सांचीपासून ९ किलोमीटरवर) : येथे ग्रीक राजा ॲन्टिअल्किडासचा दूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे.
 • उदयगिरी गुंफा (विदिशापासून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी) : येथील भूवराहाचे देऊळ आणि दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख.
 • भीमबेटका (भोपाळच्या दक्षिणेला ४५ किलोमीटरवर) : येथील गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आहेत.
 • भोजपूर गाव (भीमबेटकाच्या दक्षिणेला २५ किलोमीटरवर) : येथे भोजेश्वर महादेवाच्या अतिपुरातन देवळात १८ फूट उंचीची शंकराची पिंडी आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]