शिमला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिमला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

  ?शिमला
हिमाचल प्रदेश • भारत
—  शहर  —
शिमला
शिमला

३१° ०६′ ११.८८″ N, ७७° १०′ १९.९२″ E

गुणक: 31°06′40″N 77°09′14″E / 31.111°N 77.154°E / 31.111; 77.154
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
समुद्री किनारा
२५ चौ. किमी
• २,१३० मी
• ४८ किमी
हवामान
वर्षाव
Am (Köppen)
• २,७४३ मिमी (१०८.० इंच)
जिल्हा शिमला
लोकसंख्या
घनता
१,६३,००० (२००१)
• १२०/किमी
महापौर सोहन लाल
आयुक्त शेखर गुप्ता
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

त्रुटि: "171 0xx" अयोग्य अंक आहे
• +०१७७
• INSHI
• HP-03, HP-51
संकेतस्थळ: शिमला मनपा संकेतस्थळ

गुणक: 31°06′40″N 77°09′14″E / 31.111°N 77.154°E / 31.111; 77.154


१८६४ साली ब्रिटिशांनी शिमला उन्हाळी राजधानी घोषीत केली. एक प्रसिद्ध, लोकप्रिय पर्यटन स्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या पहिले शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजा बरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून शिमला काबीज केले होते. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत शिमला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजना नंतर शिमला हिमाचल प्रदेश ची राजधानी म्हणून विकसित झाले.

इतिहास[संपादन]

शिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी घर बनवले. लवकरच शिमला लॉर्ड विल्लियम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गवर्नर जनरल होते.

भूगोल[संपादन]

शिमला पश्चिम हिमालयाच्या उत्तरस्थित आहे. शिमला २३९७.५९ मीटर उंचीवरील एका टोकावर पसरलेले आहे.

संस्कृति[संपादन]

येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. शिमला समर फेस्टिवल दर वर्षी पिक-सिजन मध्ये आयोजित केला जातो.

पर्यटन[संपादन]

हिमाचल प्रदेशची राजधानी आणि ब्रिटिष्कालीन उन्हाळी राजधानी शिमला एक महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र आहे. शिमला साधारण ७२६७ फूट उंचीवर असून, वर्षभर थंड वातावरण असते. येथे हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते.


पर्यटन आकर्षण

रिज[संपादन]

शहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे जेथून पर्वतरांगा पाहू शकतो. येथे शिमाल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे.

मॉल[संपादन]

शिमाल्याचे मुख्य व्यापारी केंद्र. गेयटी थियेटर हे प्राचीन ब्रिटीश थियेटरचेच एक रूप आहे,आत्ता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरीता हि.प्र.प.वि.नि.च्या लिफ्ट/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार, लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे.

काली बारी मंदिर[संपादन]

हे मंदिर स्कँडल पॉइंट पासून जनरल पोस्ट ओफ्फिस कडे जाताना जवळच आहे.


जाखू मंदिर[संपादन]

(2.5 कि.मी.) 2455 मी. : शिमल्यातिल सर्वात उंच ठिकाणाहून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे.

राज्य संग्रहालय[संपादन]

(3 कि.मी.): हिमाचल प्रदेशची ऐतिहासिक वास्तुकला आणि चित्रांचा संग्रह. संग्रहालय सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत चालू असते. सोमवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ते बंद असते.

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऍड्व्हान्स स्टडी[संपादन]

(4 कि.मी.) 1983 मी. : हे ब्रिटिशकालीन भवन पूर्वी वॉईसरायचे राहण्याचे ठिकाण होते.

प्रॉस्पेट हिल[संपादन]

(5 कि.मी.) 2155 मी. : शिमला - बिलासपुर मार्गावरील हे ठिकाण बालुगंज पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे कामना देवीचे मंदिर आहे. येथून पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते.

समर हिल[संपादन]

(7 कि.मी.) 1983 मी. : शिमला - कालका मार्गावरील एक सुंदर ठिकाण आहे. येथील वातावरण शांत असून रस्ते झाडांनी व्यापले आहेत. आपल्या शिमला दौऱ्यादरम्यान महात्मा गांधी राजकुमारी अमृत कौर यांच्या जॉर्जियन हाउस मध्ये राहिले होते. येथे हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय आहे.

चाडविक धबधबा[संपादन]

(7 कि.मी.) 1586 मी. : दाट जंगलातील हे स्थान समर हिल चौकापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर आहे.

संकट मोचन[संपादन]

(7 कि.मी.) 1975 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर.

तारादेवी[संपादन]

(11 कि.मी.) 1851 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) प्रसिद्ध मंदिर.

शिक्षण[संपादन]

शहरामध्ये १४ अंगणवाड्या आणि ६३ प्राथमिक विद्यालय आहेत तसेच बऱ्याच ब्रिटीशकालीन शाळा आहेत. शिमल्यात इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि दंत महाविद्यालय आहे.

दळणवळण[संपादन]

बस[संपादन]

शिमला बसने हिमाचल प्रदेश मधील इतर शहराशी तसेच दिल्ली, चंदिगडला जोडले गेले आहे.

रेल्वे[संपादन]

शिमला नॅरोगेज मार्गाने कालकाशी जोडले आहे जे भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडले आहे. कालका ते शिमला टोय ट्रेन हे युनेस्कोच्या हेरिटेज स्थळापैकी एक आहे.

विमानतळ[संपादन]

शिमला विमानतळ जुब्बारहत्ती (१२ कि. मी.) येथे असून, दिल्लीला विमानसेवेने जोडले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

शिमलाच्या प्रेक्षणीय स्थळाची बातमी

कालका ते शिमला ट्रेन माहिती