झालोद
Appearance
झालोद गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे शहर राजस्थान सीमेलगत टिटोडी नदीवर वसलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,७२० आहे.
झालोद पूर्वीच्या पंचमहाल प्रदेशातील पाच पैकी एक महाल होता. येथे मराठ्यांनी बांधलेला एक छोटेखानी किल्ला आहे.