कारगिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कारगिल
ആലപ്പുഴ
भारतामधील शहर

Kargil Town Panorama.jpg

कारगिल is located in जम्मू आणि काश्मीर
कारगिल
कारगिल
कारगिलचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
कारगिल is located in भारत
कारगिल
कारगिल
कारगिलचे भारतमधील स्थान

गुणक: 34°33′N 76°8′E / 34.55°N 76.13333°E / 34.55; 76.13333गुणक: 34°33′N 76°8′E / 34.55°N 76.13333°E / 34.55; 76.13333

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा कारगिल
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७८० फूट (२,६८० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४३,३८८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कारगिल हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या २०४ किमी पूर्वेस तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस स्थित आहे. २०११ साली १.४३ लाख लोकसंख्या असलेले कारगिल लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगिल सुरू नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगिलमधून जातो. कारगिलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगिल विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगिल भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगिल पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत