उस्मानाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?उस्मानाबाद
Osmanabad
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° १०′ ००″ N, ७६° ०३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ६४७ मी
जिल्हा उस्मानाबाद जिल्हा
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
१,१२,०८५ (2011)
१.०७६ /
भाषा मराठी
प्रशासक हरिकल्याण येलगट्टे [१]
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५०१
• +०२४७२
• MH-25
संकेतस्थळ: osmanabad.gov.in

उस्मानाबाद हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. त्याचे नाव ७व्या निजाम मीर उस्मान अली खान नंतर ठेवले गेले आहे.

इतिहास[संपादन]

उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा निझाम मीर उस्मान अली खान याच्या नावावरून पडले. काही लोक उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असण्याचा दावा करतात. उस्मानाबाद जिल्हा अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीपर्यंत ‘धाराशिव’ न वापरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत.[२]


लोकसंख्या[संपादन]

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या १,१२,०८५ होती. पैकी ५८,०९८ पुरुष तर ५३,९८७ स्त्रिया होत्या. १३,३४६ व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. उस्मानाबाद शहराचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहे. साक्षरता प्रमाण ८८.१५% आहे. पुरुष साक्षरता ९३.४५% आहे, तर स्त्री साक्षरता ८२.५२% आहे


आई तुळजाभवानी ही उस्मानाबाद कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परंडा येथील भूईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून, येथील जलमहाल हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्ग जवळ अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगाव येथील कल्याणस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर तसेच शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा प्रसिद्ध आहे.

शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'उस्मानाबाद’ नावाची जैन लेणी आहेत. उस्मानाबाद बहामणी आणि विजापूर संस्थानात अाले. १९४८ पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात होते. उस्मानाबादची शेळी प्रशिद्ध आहे

या जिल्ह्यामध्ये परंडा व नळदुर्ग या ठिकाणी किल्ले आहेत. तुळजापूर या ठिकाणी तुळजा भवानीचे भव्य मंदिर आहे. उस्मानाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बालाघाट डोंगर रागामध्ये वसलेले गाव आहे. त्या जवळ तुळजाभवानी देवीचे मंदिर जवळ लाभले गेले आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध असे हतलादेवी मंदिर ही आहे. श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे उस्मानाबाद पासून १५ कि. मी. अंतरावर दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम आहे.

खास पदार्थ[संपादन]

उस्मानाबादचे गुलाब जामून तसेच उस्मानाबादी शेळीचे मटन प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी जवळील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील खवा, पेढे प्रसिद्ध आहेत. दूध उत्पादनात घाटंग्री हे गाव अग्रेसर आहे...

शिक्षणसंस्था[संपादन]

उस्मानाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आहे.

वाहतूक[संपादन]

उस्मानाबाद शहर राष्ट्रीय महामार्ग ५२[३] वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-औरंगाबाद-बीड-उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर-विजयपूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक) असा जातो.

उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे. उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्याच्या कामाचा शुभारंभ". 2022-03-29 रोजी पाहिले.
  2. ^ "उस्मानाबादच नाव बदलण्यास बॉम्बे हाय कोर्ट ने मनाई केली". Indian Express (इंग्रजी भाषेत). 20 April 2023. ISSN 0971-751X. 20 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Details of National Highways (NHs) as on 31.03.2019