उदयपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयपूर
भारतामधील शहर

Evening view, City Palace, Udaipur.jpg
सिटी पॅलेस व शहराचे दृष्य
उदयपूर is located in राजस्थान
उदयपूर
उदयपूर
उदयपूरचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 24°35′N 73°41′E / 24.58333°N 73.68333°E / 24.58333; 73.68333गुणक: 24°35′N 73°41′E / 24.58333°N 73.68333°E / 24.58333; 73.68333

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा उदयपूर जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५५९
क्षेत्रफळ ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,००० फूट (६१० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,९८,,६८५
  - घनता २४२ /चौ. किमी (६३० /चौ. मैल)
  - महानगर १०,६४,२२२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

उदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिछोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादींसाठी येथे जगभरातून पर्यटक येतात.

मुंबईदिल्लीदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ उदयपूरमधूनच जातो. उदयपूर विमानतळ शहराच्या २२ किमी पूर्वेस स्थित आहे. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: