देवनहळ्ळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवनहळ्ळी कर्नाटक राज्याच्या बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील शहर आहे. बंगळूर शहराचे उपनगर असलेले हे शहर तेथपासून ४० किमी ईशान्येस आहे.

येथे देवनहळ्ळी बिझनेस पार्क तसेच इतर व्यावसायिक भाग आहेत. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या उपनगरात आहे.

देवनहळ्ळी टिपू सुलतानचे जन्मगाव आहे.