राष्ट्रीय महामार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे

राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० किमी पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारने १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारतातील एकुण रस्त्यांच्या फक्त २% रस्ते रा. म. आहेत, पण एकुण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत[१].

उत्तर प्रदेशातील वाराणसी ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत धावणारा तसेच जबलपुर, नागपूर, हैदराबादबंगळूर ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब रा. म. ७ हा सर्वात लांब तर एर्नाकुलम ते कोची असा ६ किमी धावणारा रा. म. ४७अ हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. दिल्ली-आग्रा (रा. म. २), दिल्ली-जयपुर (रा. म. ८), अमदावाद-वडोदरा (रा. म. ८), मुंबई-पुणे (रा. म. ४), बंगळूर-चेन्नई (रा. म. ४) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]