पिथोरागढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिठोरागढ या पानावरून पुनर्निर्देशित)

पिथोरागढचे नकाशावरील स्थान

पिथोरागढ
भारतामधील शहर


पिथोरागढ is located in उत्तराखंड
पिथोरागढ
पिथोरागढ
पिथोरागढचे उत्तराखंडमधील स्थान

गुणक: 29°35′9″N 80°12′55″E / 29.58583°N 80.21528°E / 29.58583; 80.21528

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा पिथोरागढ
समुद्रसपाटीपासुन उंची ५,३३८ फूट (१,६२७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५६,०४४
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


पिथोरागढ हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या पिथोरागढ ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पिथोरागढ उत्तराखंडच्या कुमाऊँ भागात हिमालय पर्वतरांगेत वसले असून ते ह्या भागामधील सर्वात मोठे नगर आहे. २०११ साली पिथोरागढची लोकसंख्या सुमारे ५६ हजार होती.

राष्ट्रीय महामार्ग ९ पिथोरागढला दिल्लीसोबत जोडतो. पिथोरागढ विमानतळ हा येथील एक छोटा विमानतळ असून येथून मोजकीच विमाने सुटतात. हल्द्वानी येथील काठगोदाम रेल्वे स्थानक येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिव्हॉयेज वरील पिथोरागढ पर्यटन गाईड (इंग्रजी)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत