वांद्रे


वांद्रे (जुने नाव:बांद्रा) हे मुंबईतील एक मोठे उपनगर आहे. परप्रांतीयांनी व चा ब केल्याने या ठिकाणाचे नाव काही अंशी बदलले गेले होते. वांद्रे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे. रेल्वे लाईनमुळे वांद्रेचे पूर्व वांंद्रे आणि पश्चिम वांद्रे असे दोन भाग पडले आहेत.
पश्चिम वांद्रे हा मुंबईतील सर्वात जास्त ख्रिश्चनांची (कॅथॉलिकांची) वस्ती असलेला भाग आहे.[ संदर्भ हवा ] वांद्रे हे माउंट मेरी चर्चसाठी प्रसिद्ध आहे. माउंट मेरीचा बॅसिलिका पुतळा हे येथील खास आकर्षण आहे. पश्चिम वांद्रे येथील लिकिंग रोड हा खरेदीसाठी व फिरण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतो. काही वर्षापासून पश्चिम वांद्रे हे मुंबईचे रेस्टोरंट उपनगर म्हणून ओळखले जात आहे.
वांद्रे (पूर्व) येथे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पे अँड अकाउंट्सचे प्रशासकीय कार्यालय आहे. तो भाग वांद्रे-कुर्ला संकुल (Vandre Kurla Complex) VKC म्हणून ओळखला जातो. येथे पोहोचण्यासाठी शास्त्रीनगर, बेहरामपाडा अशा झोपडपट्ट्यांमधून मार्ग काढावा लागतो. वांद्रे येथे स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक गणपतराव देवाजी तपासे ह्यांच्या नावे एक चौक आहे. वांद्रे पूर्व कलानगर परिसरातून जाणारा वांद्रे शीव लिंक रस्ता जिथे धारावी बाजूला असलेल्या माहीम शीव लिंक रस्त्याला मिळतो तेथे हा चौक आहे.[१][ संदर्भ हवा ]
ऐतिहासिक पार्श्वभूमी
[संपादन]वांद्रे हा साष्टी बेटाचा एक भाग होता. हे २५ पाखाड्यांचे होते. त्यापैकी रानवर, शेर्ली, राजन, पाली, चुईम, चिंबई, इत्यादी गावे आजही अस्तित्वात आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स,मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५