तमिळनाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडू
भारताच्या नकाशावर तमिळनाडूचे स्थान.
भारताच्या नकाशावर तमिळनाडूचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना नोव्हेंबर १, १९५६
राजधानी चेन्नईगुणक: 13°05′N 18°16′E / 13.09°N 18.27°E / 13.09; 18.27
सर्वात मोठे शहर चेन्नई आणि मदुराई
सर्वात मोठे महानगर चेन्नई
जिल्हे ३२
क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ. किमी (५०,२१६ चौ. मैल) (११)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
७२,१३८,९५८ (७)
 - ५५० /चौ. किमी (१,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)

आर्. एन्. रवी
एम्. के. स्टॅलिन
तमिळनाडू विधानसभा (२३५)
राज्यभाषा तमिळ
आय.एस.ओ. कोड IN-TN
संकेतस्थळ: tn.gov.in/
TamilNadu Logo.svg

राज्यचिन्ह

तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागरश्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखरसिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.

तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदूळ, रागी, कापूसऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदीवैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

प्रागैतिहासिक[संपादन]

साम्राज्यांचा काळ[संपादन]

चोळ साम्राज्य[संपादन]

विजयनगर आणि नायकांचा काळ[संपादन]

युरोपिअन शासनकर्त्यांचा काळ[संपादन]

भारतीय स्वातंत्र्या नंतरचा काळ[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

शासन आणि प्रशासन[संपादन]

जिल्हे[संपादन]

तमिळनाडूमधील जिल्हे

तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.

 1. अरियालूर
 2. चेन्नई
 3. कोइंबतूर
 4. कडलूर
 5. धर्मपुरी
 6. दिंडुक्कल
 7. इरोड
 8. कांचीपुरम
 9. कन्याकुमारी जिल्हा
 10. करुर
 11. कृष्णगिरी
 12. मदुरै
 13. नामक्कल
 14. नामक्कल
 15. निलगिरी
 16. पेरंबळूर
 1. पुदुकट्टै
 2. रामनाथपुरम
 3. सेलम
 4. शिवगंगै
 5. तंजावुर
 6. तेनी
 7. तूतुकुडी
 8. तिरुचिरापल्ली
 9. तिरुनलवेली
 10. तिरुपूर
 11. तिरूवल्लूर
 12. तिरुवनमलाई
 13. तिरुवरुर
 14. वेल्लूर
 15. विलुप्पुरम
 16. विरुधु नगर

राजकारण[संपादन]

भौगोलिक विस्तार आणि समाज[संपादन]

हिमालय सोदुन् भारतातले सर्वात उन्च शिखर आनैमुदई हे तमिलनदुमध्ये आहे . उन्ची २६९५ मितर

शिक्षण आणि सामाजिक सुधारणा[संपादन]

संस्कृती[संपादन]

भाषा आणि साहित्य[संपादन]

तमिळ (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते.

धर्म आणि जातीव्यवस्था[संपादन]

२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% हिंदू, ६.१% ख्रिश्चन, ५.९% मुस्लिम, ०.१% जैन आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत.

Usatv=== सणवार /उत्सव ===

संगीत[संपादन]

कला आणि नृत्य[संपादन]

चित्रपट सृष्टी[संपादन]

खाद्यसंस्कृती[संपादन]

राज्याची मानचिन्हे[संपादन]

राज्य प्रतिके तमिळनाडू
भाषा तमिळ
गीत
Neerarum Kadaludutha.jpg
तमिळ देवीस आवाहन
नृत्य भरतनाट्यम
प्राणी
Niligiri Tahr found in Rajamala,Munnar.jpg
निलगिरी तहर
पक्षी
Chalcophaps indica -National Aquarium -Baltimore-8a.jpg
पाचू कवडा
फुल
Starr 080716-9320 Gloriosa superba.jpg
कळलावी
वनस्पती
Borassus flabellifer.jpg
ताड
खेळ
A Kabaddi match at 2006 Asian Games.jpg
कबड्डी

अर्थव्यवस्था[संपादन]

शेतीव्यवसाय[संपादन]

कापडगिरण्या,वाहन आणि अवजड उद्योग[संपादन]

अणुसंधान आणि सॉफ्टवेर उद्योग[संपादन]

अन्न आणि पेयपदार्थ प्रक्रिया उद्योग[संपादन]

मूलभूत सुविधा[संपादन]

वातावरण[संपादन]

खेळ/क्रीडा[संपादन]

पर्यटन[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]