वापी
Jump to navigation
Jump to search
वापी વાપી |
|
भारतामधील शहर | |
पश्चिम रेल्वेवरील वापी रेल्वे स्थानक |
|
देश | ![]() |
राज्य | गुजरात |
जिल्हा | वलसाड जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,६३,६३० |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
वापी (गुजराती: વાપી) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर आहे. वापी शहर गुजरातच्या दक्षिण भागात गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ राष्ट्रीय महामार्ग ८ वर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून ३७८ किमी तर मुंबईहून १७५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वापीची लोकसंख्या १.६३ इतकी होती व ते सुरत खालोखाल दक्षिण गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
वापीच्या पूर्वेस दादरा आणि नगर-हवेली तर पश्चिमेस दमण हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण-वापी-सिल्वासा हे आजच्या घटकेला एक महानगर मानले जाते. वापी भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून येथे रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्यामुळे वापी जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक मानले जाते.