दुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम(कठीण) असते असे बांधलेले ठिकाण. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो.किला हे इतिहासाची ओळख मानली जाते.

दुर्गांचे प्रकार[संपादन]

प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

मनुस्मृती[संपादन]

मनुस्मृतीत आढळणारे किल्ल्यांचे प्रकार-

 • घनदुर्ग
 • महीदुर्ग
 • अष्दुर्ग
 • वार्क्षदुर्ग
 • नृदुर्ग
 • गिरीदुर्ग

देवज्ञविलास ग्रंथ[संपादन]

लाला लक्ष्मीधर याने राजा कृष्णदेवराय च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार)

 • गिरिदुर्ग
 • वनदुर्ग
 • गव्हरदुर्ग(गुहेचा किल्ला म्हणून उपयोग)
 • जलदुर्ग
 • कर्दमदुर्ग (दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला)
 • मिश्रदुर्ग (वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करून बांधलेला)
 • मृतिका दुर्ग
 • दारू दुर्ग
 • ग्रामदुर्ग
 • कोट (सभोवताली लाकूड वापरून तयार केले संरक्षण)

हेसुद्धा पहा[संपादन]