Jump to content

पानिपत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Panipat (es); Panipat (ms); পানিপাত (bpy); Panipat (tr); پانی پت (ur); Panipat (mg); Panipat (sv); Паніпат (uk); Понипат (tg); 帕尼帕特 (zh-cn); 파니파트 (ko); Panipato (eo); Pánipát (cs); पानीपत (bho); পানিপথ (bn); Pânipat (fr); पानिपत (mr); Panipat (or); Panipata (lv); Панипат (sr); Panipate (pt-br); 帕尼帕特 (zh-sg); Panipat (nan); Panipat (nb); ಪಾಣೀಪತ್ (kn); Panipat (en); باني بت (ar); પાનિપત (gu); Panipat (eu); Panipat (ast); Panipat (ca); Panipat (de); Паніпат (be); پانی‌پات (fa); 帕尼帕特 (zh); Panipat (da); पानीपत (ne); パーニーパット (ja); بانى بت (arz); פניפט (he); Панипат (tt); पाणिपत् (sa); पानीपत (hi); పానిపట్ (te); Panipat (fi); பானிப்பட் (ta); Panipat (it); პანიპატი (ka); 帕尼帕特 (zh-hans); Panipat (nl); Պանիպատ (hy); Pānīpat (ceb); Panipat (oc); Panipat (id); Panipat (sr-el); پانیپت (pnb); 帕尼帕特 (zh-hk); Panipat (pam); Panipatas (lt); Панипат (ru); Panipat (war); Панипат (sr-ec); Panipat (pt); พานิแพต (th); Panipat (pl); പാനിപ്പത്ത് (ml); 帕尼帕特 (zh-tw); පනිපට් (si); Panipat (vi); پاڻيپٽ (sd); 帕尼帕特 (zh-hant); پانی‌پت (azb); पानीपत (awa); Πανιπάτ (el); ਪਾਣੀਪਤ (pa) ciudad de India (es); ville de l'Inde (fr); Город в Индии (ru); city in India (en); Stadt in Indien (de); dinas, India (cy); οικισμός της Ινδίας (el); インドの都市 (ja); cidade na Índia (pt-br); stad i Indien (sv); تجمع سكان فى بانى بت (arz); kota di India (id); Місто в Індії (uk); nederzetting in India (nl); kaupunki Intiassa (fi); हरियाणा, भारत में एक शहर (hi); హర్యానా రాష్ట్రం లోని చారిత్రిక నగరం (te); ਹਰਿਆਣਾ (ਭਾਰਤ) ਦਾ ਸ਼ਹਿਰ (pa); city in India (en); مستوطنة بشرية (ar); indické město, dějiště tří důležitých bitev (cs); مدينة جات ف لهيند (ary) پانی پت (pnb); পানিপাত (bn); Panipat (fr); પાણીપત (gu); پانی پت (ks); Panipat, പാനിപത്, പാനിപ്പത് (ml); ಪಾಣಿಪತ್ (kn); पाणिपत् मण्डलम्, पुरुजित् (sa); पानीपत (mr); పానీపత్ (te); ਪਾਨੀਪਤ (pa); パーニーパト (ja); پانی پات (fa); 巴尼伯德, 巴尼伯特 (zh); பானிபட் (ta)
पानिपत 
city in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारशहर,
प्रशासकीय विभाग
ह्याचा भागपानिपत जिल्हा
स्थान पानिपत जिल्हा, कर्नाल विभाग, हरियाणा, भारत
शासनप्रकार
संस्थापक
क्षेत्र
  • ६४ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २१९ ±1 m
अधिकृत संकेतस्थळ
Map२९° २३′ १५″ N, ७६° ५८′ १२″ E
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे भारतीय इतिहासाला प्रत्येक वेळी वेगळे वळण लागले.

इतिहास

[संपादन]

या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणीमध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मिती केली. त्यांपैकी एक शहर होते पांडुप्रस्थ. तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.

इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. असे म्हणले जाते की ही युद्धे झाली नसती, अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा लागला असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.

पानिपतचे पहिले युद्ध इसवी सन १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा त्याने लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला.

पानिपतचे दुसरे युद्ध इसवी सन १५५६]] मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झाली व भारतातील मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.

पानिपतचे तिसरे युद्ध बुधवार, १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीही मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रुस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपुष्टात आले. याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफावण्यास झाला.

पानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उत्तर व ७६.९७° पूर्व आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.

पानिपत शौर्य स्मारक

[संपादन]

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा जरी पराभव झाला असला तरी युद्धात दाखवलेल्या मराठ्यांच्या शौर्यामुळे मोगल शत्रूंनी पुढे भारतावर आक्रमण करण्याचे धाडस केले नाही. ह्या युद्धात दाखविलेल्या शौर्याची स्मृती जीवंत राहावी म्हणून येथे पानिपत शौर्य स्मारक बांधण्यात येणार आहे.[]

पानिपतवरील पुस्तके

[संपादन]
  • ...आणि पानिपत (कादंबरी, लेखक - संजय सोनवणी)
  • नवरत्ने हरपली रणांगणी (दत्ताजी शिंदे यांच्यावरील कादंबरी, लेखक - वासुदेव बेलवलकर)
  • पाणिपतची बखर (रघुनाथ यादव)
  • पानिपत (लेखक - विश्वास पाटील). या कादंबरीची गुजराती-कानडी-हिंदी वगैरे भाषांत अनुवाद झाले आहेत.
  • पानिपत (सचित्र आवृत्ती, लेखक - विश्वास पाटील)
  • पानिपतचा अखेरचा रणसंग्राम (लेखक - राजा लिमये)
  • पानिपत असे घडले...(लेखक - संजय क्षीरसागर)
  • पानिपतचा रणसंग्राम (लेखक - दुर्गेश परुळकर, डॉ. सच्चिदानन्द शेवडे)
  • पानिपतचा विजय (लेखक - प्रा. नामदेवराव जाधव)
  • पानिपत १७६१ (लेखक - त्र्यं शं. शेजवलकर)
  • पानिपतावरील संकल्पित महाकाव्याचा भाग (कवी - वि.दा. सावरकर)
  • प्रतिशोध ..पानिपतचा (कादंबरी, लेखक - कौस्तुभ कस्तुरे)
  • Solstice at Panipat (डॉ. उदय स. कुलकर्णी) मराठी अनुवादक - विजय बापये
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,२७ जून २०२५