अलाहाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलाहाबाद येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य

अलाहाबाद (हिंदी: इलाहाबाद ; उर्दू: الله آباد ; रोमन लिपी: Allahabad ; फारसी अर्थ: परमेश्वराने वसवलेले नगर; ) हे प्राचीनकाळी प्रयाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगराला मुघलांनी दिलेले नाव असून, काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात वसले असून अलाहाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

गंगा, यमुना या नद्यांचा अलाहाबाद शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैननाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]