उत्तराखंड
?उत्तराखंड भारत | |
— राज्य — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ५३,५६६ चौ. किमी |
राजधानी | देहरादून |
मोठे शहर | देहरादून |
जिल्हे | १३ |
लोकसंख्या • घनता साक्षरता |
८४,७९,५६२ (१९ वे) (२००१) • १५८/किमी२ ७२ % |
भाषा | हिंदी, गढवाली, कुमाओनी |
राज्यपाल | गुरमीत सिंग |
मुख्यमंत्री | पुष्कर सिंग धामी |
स्थापित | ९ नोव्हेंबर २००० |
विधानसभा (जागा) | उत्तराखंड विधानसभा (71) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-UL |
संकेतस्थळ: उत्तराखंड संकेतस्थळ |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ. किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. हिंदी गढवाली अणि कुमाऊँनी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंडची साक्षरता ७९.६३ टक्के आहे. गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत.
इतिहास[संपादन]
जून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत. रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे. जून २३, इ.स. २०१३ च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.
भूगोल[संपादन]
जिल्हे[संपादन]
उत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.