नांदेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हा लेख नांदेड शहराविषयी आहे. नांदेड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?नांदेड
महाराष्ट्र • भारत

१९° ०९′ ००″ N, ७७° १९′ ५९.८८″ E

गुणक: 19°05′N 77°16′E / 19.09°N 77.27°E / 19.09; 77.27
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १०,३३२ चौ. किमी
जिल्हा नांदेड
लोकसंख्या
घनता
२८,६८,१५८ (२००१)
• २७८/किमी
महापौर सौ.शिला किशोर भवरे

उंची=

कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१६०३
• +०२४६२
• MH२६

गुणक: 19°05′N 77°16′E / 19.09°N 77.27°E / 19.09; 77.27

नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून पडले असल्याचे सांगण्यात येते. नांदेड शहरात शीखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरू गोविंद सिंग यांच्या समाधीवर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब (पहा हुजूर साहिब नांदेड) आहे. काही वर्षांपूर्वी येथे शीख समाजाचा गुरूतागद्दी हा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नांदगिरी नावाचा किल्ला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प विष्णुपुरी धरण येथेच आहे. तसेच सोनखेड येथील संत तुकाराम महाराज मंदिर प्रसिध्द आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, आंध्र प्रदेशच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, बीड, हिंगोलीयवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद हा आंध्र प्रदेशातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे आणि दिल्ली,मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, बंगळूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नांदेडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे. नांदेड हे हवाई मार्गाने दिल्ली, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि त्रिवेंद्रम या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी गो एअर, स्पाईस जेट आणि किंगफिशर एअरलाइन्स या कंपन्यांच्या विमानांनी नांदेडला जाता येते.

स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नांदेडमध्ये आहेत.

संस्कृती[संपादन]

भाषा[संपादन]

नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी भाषा आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक तेलुगू, कन्नडदखनी उर्दू भाषेत सुध्दा बोलतात .

परंपरा[संपादन]

माळेगावची जत्रा,सोनखेड येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह, हिंदूशीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे अत्यंत छान असतात. रावण दहन, दीपावली, संदल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, शिवजयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, गणेश उत्सव हे दिवसही उत्साहाने साजरे होतात.


वृत्तपत्रे[संपादन]

नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -

  • दैनिक गोदातीर समाचार
  • दैनिक प्रजावाणी
  • दैनिक भूमिपुत्र
  • दैनिक लोकपत्र
  • दैनिक सकाळ
  • दैनिक सत्यप्रभा

प्रसारमाध्यमे[संपादन]

उद्याचा मराठवाडा, गोदातीर समाचार, प्रजावाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ ही मराठी वृत्तपत्रे आणि इंडियन एक्सप्रेसटाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रांचा नांदेडमध्ये अधिक खप आहे.[ संदर्भ हवा ]. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे. नांदेडमध्ये आकाशवाणी, रेडियो सिटी ही रेडियो केंद्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आय्‌बीएन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत[ संदर्भ हवा ]. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्‌एन्‌एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आहेत[ संदर्भ हवा ].

शिक्षण[संपादन]

नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नांदेडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे.

विद्यापीठ[संपादन]

इ.स. १९९४ साली नांदेड विद्यापीठाची (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

नांदेड मधील अभियांत्रिकी महाविद्यालये[संपादन]

वैद्यकीय महाविद्यालये[संपादन]

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा महाविद्यालये[संपादन]

सैनिकी शाळा[संपादन]

  • राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी येथे आहे. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी या सैनिकी शाळेसाठी आयुष्य वेचले.

राजकारण[संपादन]

नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहीत असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. सध्या नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. अशोक चव्हाण आहेत, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.

हेसुद्धा पहा[संपादन]

shelgaon gouri is one of the most clean village.

बाह्य दुवे[संपादन]