झारखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झारखंड
ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ
جھارکھنڈ
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान.
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १५ नोव्हेंबर २०००
राजधानी रांचीगुणक: 23°21′N 85°20′E / 23.35°N 85.33°E / 23.35; 85.33
सर्वात मोठे शहर जमशेदपूर
जिल्हे २४
लोकसभा मतदारसंघ १४
क्षेत्रफळ ७९,७१४ चौ. किमी (३०,७७८ चौ. मैल) (१५ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
३,२९,६६,२३८ (२२वा)
 - ४१४ /चौ. किमी (१,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

द्रोपदी मुर्मू
हेमंत सोरेन
विधानसभा (८२)
झारखंड उच्च न्यायालय
राज्यभाषा संथाळी, हिंदी
आय.एस.ओ. कोड IN-JH
संकेतस्थळ: jharkhand.nic.in
12

झारखंड (संताली: ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ) हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत