इटारसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटारसी is located in मध्य प्रदेश
इटारसी
इटारसी
इटारसीचे मध्य प्रदेशमधील स्थान

इटारसी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. इटारसी मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात होशंगाबादच्या दक्षिणेस वसले आहे. २०११ साली इटारसीची लोकसंख्या १.१४ लाख होती.

इटारसी रेल्वे स्थानक

इटारसी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गहावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हे भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग इटारसीमधून धावतात. मुंबई, दिल्ली, कोलकाताचेन्नई ह्या चारही महानगरांतून सुटणाऱ्या गाड्या येथून जातात. इटारसी रेल्वे स्थानक पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.