जेसलमेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेसलमेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.हे शहर जेसलमेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे पश्चिम राजस्थानात असून प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या शहराला मानाने गोल्डन सिटी (सोनेरी शहर) असे संबोधतात. या शहरातील मध्ययुगीन प्राचीन किल्ला आजही शाबूत आहे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या शहराची स्थापना ११ व्या शतकात राजपूत महारावळ यांनी केली. इस्लामी राजवटीतही या घराण्याचे शहरावरील नियंत्रण कायम राहिले.


भौगोलिक[संपादन]

जेसलमेर हे शहर थार वाळवंटाच्या अगदी मध्य भागी स्थित नसले तरी बऱ्यापैकी वाळवंटी भागात स्थित आहे. शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या, छोट्या टेकड्या, डोंगर, संमिश्र काटेरी वने आहेत. यांपैकी एका टेकडीवर जेसलमेरचा किल्ला वसला आहे. वाळूच्या टेकड्या सततच्या विषम वातावरणाने आपले भौगोलिक स्थान बदलत असतात. इंदिरा कालव्याच्या पाण्याने सद्यस्थिती पूर्ण पणे बदललेली आहे व शहर परिसरात अनेक ठिकाणी वनराया तयार झालेल्या आहेत.

इतिहास[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

बी.बी.सी जैसलमेर स्लाईडशो