चाळीसगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?चाळीसगाव
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 20°27′36″N 74°59′23″E / 20.46°N 74.98972°E / 20.46; 74.98972
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील चाळीसगाव
पंचायत समिती चाळीसगाव

गुणक: 20°27′36″N 74°59′23″E / 20.46°N 74.98972°E / 20.46; 74.98972


चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून डोंगरी नदी वाहते.

'
शहर चाळीसगाव
जिल्हा जळगाव
राज्य महाराष्ट्र
जनगणना वर्ष इ.स. २००१
लोकसंख्या --
दूरध्वनी कोड ०२५८९
पोस्ट्ल कोड ४२४१०१
आर.टी.ओ कोड MH-१९

दळण वळण[संपादन]

चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. हे भुसावळनजीक असलेले मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबईपुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगाव, नासिक, औरंगाबादधुळे ही शहरे येथून साधारणतः समान अंतरावर आहेत.

भूगोल[संपादन]

चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोराभडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरीतित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणार्‍या तापी नदीस मिळते.

पर्यटन[संपादन]

चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठावेरूळ ही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत पाटणादेवीपितळखोरे लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत.[ व्यक्तिगतमत ] पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे.

तरवाडे बु. येथे एक साईबाबा मंदिर आहे. ते चाळीसगावपासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर व रेखीव आहे.[ व्यक्तिगतमत ] या ठिकाणी दर वर्षास मंदिराचा वर्धापन सोहळा होतो. त्यावेळी या ठिकाणी हजारो भाविक भेट देतात.

उद्योग[संपादन]

इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे.

कृषी[संपादन]

चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरीगहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे[संपादन]

चाळीसगाव तालुक्यातील गावे[संपादन]

जामदा, मेहुणबारे,(खेडगाव) धामणगाव, पिलखोड,खडकी (चाळीसगाव तालुका), हिरापूर, तळेगाव, रोहिणी, पिंपळगाव (राजदेहरे), राजदेर तांडा, गंगाश्रम, हिंगणे, शिंदी, घोडेगाव, ओढरे, जुनपाणी, पाटणादेवी, वालझिरी, पिंपरखेड, लांबे वडगाव, कजगाव, करगाव, भोरस , चीर्फळ, टाकळी (प्र. दे.), हातगाव, बेलदारवाडी, शामवाडी, पातोंडा, नगरदेवळा, कालीमठ, उंबरखेड, तांबोळे, तरवाडे, बहाळ, दहिवद, वाघळी, सायगाव, पिंपळखेड, रांजणगाव ,बॊरखॆडा बु ,देवळी,गोरखपूर.

बाह्य दुवे[संपादन]

  1. Chalisgaon : Developement Potential and Challenges (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  2. MIDC Chalisgaon
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड