हिंगणघाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?हिंगणघाट
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

२०° ३४′ १२″ N, ७८° ४९′ ४८″ E

गुणक: 20°33′35″N 78°49′47″E / 20.55972°N 78.82972°E / 20.55972; 78.82972
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २१७ मी
लोकसंख्या १,२९,५६७[१] (२०१५)
भाषा मराठी
आमदार समीर त्र्यंबकराव कुणावर
नगराध्यक्ष प्रेम बसंतानी
संसदीय मतदारसंघ वर्धा
तहसील हिंगणघाट
पंचायत समिती हिंगणघाट
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४२३०१
• +०७१५३
• MH-३२

गुणक: 20°33′35″N 78°49′47″E / 20.55972°N 78.82972°E / 20.55972; 78.82972

हिंगणघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. हिंगणघाट महाराष्ट्रातील विदर्भ विभागात नवव्या क्रमांकाचे आणि भारतातील ४८४ क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हिंगणघाट शहर नगरपालिकेने प्रशासित आहे. हे तालुक्याचे ठिकाण असून त्यात सुमारे ७६ गावांचा समावेश होतो. हिंगणघाट हे वर्धा नदीच्या सुपीक खोऱ्यामध्ये येते. हे एकेकाळी भारतीय कापसाच्या व्यापाराचे केंद्र होते.

कुष्ठरोग्यांना मदत करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे ह्यांचा येथे जन्म झाला.

भूगोल[संपादन]

हिंगणघाट 20°34′N 78°50′E / 20.57°N 78.83°E / 20.57; 78.83 येथे स्थित आहे. शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २१७ मी आहे.[२] हिंगणघाट वर्धापासून ते ३४ किमी अंतरावर आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून ७५ किमी अंतरावर आहे. हिंगणघाट हे गाव दोन्ही बाजूंनी वेणा नदीने वेढलेले आहे.

लोकसंख्या व साक्षरता[संपादन]

सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १ लाख २ हजार होती, ती २०१५ साली १ लाख ३० हजारावर गेली. तिच्यात ५२% पुरुषांचा समावेश होता.[३]

हिंगणघाटचा सरासरी साक्षरता दर ९४% आहे. हा भारतीय राष्ट्रीय सरासरी ७४% तुलनेत अधिक आहे. पुरुष साक्षरता दर ९७% आणि स्त्री साक्षरता दर ९०% आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' च्या मते, हिंगणघाटमध्ये राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा साक्षरता दर सर्वात जास्त आहे.[४] १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या युनिसेफद्वारे केल्या गेलेल्या साक्षरता विश्लेषणात हिंगणघाट ९४.३४ टक्क्यांसहित प्रथम क्रमांकावर होते. त्यानंतर वर्धा (९४.०५ टक्के), पनवेल (९३.९८ टक्के) आणि गोंदिया (९३.७० टक्के) ह्यांचा क्रमांक लागतो.[५]

धर्म[संपादन]

धर्म टक्केवारी
हिंदू
  
77.91%
बौद्ध
  
13.36%
मुस्लिम
  
7.09%
ख्रिश्चन
  
0.17%
जैन
  
0.42%
शीख
  
0.12%
इतर †
  
0.8%
धर्माचे वितरण
विशिष्ट धर्म नसलेल्या लोकांना समाविष्ट करते

हिंगणघाट विविध धर्मांच्या लोकांचे स्थायिक निवास आहे. प्रामुख्याने हिंदू धर्माच्या लोकांव्यतिरिक्त बौद्ध आणि मुस्लिम लोकसंख्यासुद्धा बरीच आहे. शहरात अनेक मंदिर, मस्जिद, स्तूप आणि चर्च आहेत.

शहरातील अंबा माता मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार जेव्हा कृष्णाने रुक्मिणीचे तिच्या लग्नाच्या सोहळ्यातून अपहरण केले, तेव्हा त्याने अंबादेवी मंदिरापासून कौंडिण्यपुरापर्यंत बोगद्याचा वापर केला. अंबा माता मंदिरात नवरात्रात विशेष पूजा होते ज्यात लोक हजारोच्या संख्येने सामील होतात.

सन १९५५ मध्ये बन्सीलाल कोचर यांनी शहरातील जैन मंदिर विकसित केले. हे मंदिर त्याच्या काचेच्या सजावटीसाठी विदर्भात सुप्रसिद्ध आहे.

शहरात दरवर्षी २८ डिसेंबरला वेणा नदीकिनारी संत गाडगेबाबांच्या स्मृतीत जत्रा आयोजित केली जाते, त्यात आजूबाजूच्या प्रदेशातील लोक हजारोंच्या संख्येने सामील होतात. त्याचप्रमाणे शहलंगडीची जत्रासुद्धा प्रसिद्ध आहे.

हिंगणघाट रेल्वे स्थानक

परिवहन[संपादन]

हिंगणघाट रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे. एक्सप्रेस सेवांमध्ये नवजीवन, नंदीग्राम, दादर, दक्षिण, जीटी, राप्तीसागर एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.

उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ या शहरातून जातो.

संदर्भ[संपादन]


वर्धा जिल्ह्यातील तालुके
आर्वी | आष्टी | सेलू | समुद्रपूर | कारंजा | देवळी | वर्धा | हिंगणघाट