बोरसद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोरसद हे भारतातील गुजरात राज्याच्या आणंद जिल्ह्यातील शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९६,९९८ होती.

बोरसद तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर चरोतर भागातील शेतमालाचे मोठे खरेदी-विक्री केन्द्र आहे. बोरसदच्या आसपासच्या सुपीक जमिनीत कापूस, तंबाखू, केळी सह अनेक पिके घेतली जातात.

१९२२-२३मध्ये सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली येथे बोरसद सत्याग्रह झाला होता.

बोरसद वाव ही मोठी विहीर इ.स. १४९७ मध्ये वासू सोमा आणि त्याच्या कुटुंबियांनी बांधली होती. ही विहिर जमिनीखाली सात मजले खोलीची आहे आणि त्यास सात कमानी आहेत. पायऱ्या उतरत या विहिरीच्या तळाशी जाता येते. नापा वांटो तळाव महमूद बेगड्याने बांधवलेले तळे आहे.