केरळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?കേരളം Kēraḷaṁ
केरळ
भारत
—  राज्य  —
गुणक: 8°28′N 76°57′E / 8.47°N 76.95°E / 8.47; 76.95
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३८,८६३ चौ. किमी
राजधानी तिरुअनंतपुरम
मोठे शहर तिरुअनंतपुरम
जिल्हे १४
लोकसंख्या
घनता
३,१८,३८,६१९ (२००१)
• ८१९/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल आर.एल. भाटिया
मुख्यमंत्री पिनाराई विजयन
विधानसभा (जागा) केरळ विधानसभा (१४१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KL
संकेतस्थळ: केरळ सरकार संकेतस्थळ

गुणक: 8°28′N 76°57′E / 8.47°N 76.95°E / 8.47; 76.95 केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटकतमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोचीकोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.[१] राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.[२][३][४] २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.[५] केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.[६][७][८]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो.[९]:122 पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो.[१०] or chera alam ("Land of the Cheras").[११]:2 केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.[१२] पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली.

इतिहास[संपादन]

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.[१३]

केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.[१४] केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.[१५]

[१६]


इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.[१७] चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.[१८][१९] चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत.[२०] रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.[२१] :192–195, 303–307 पश्चिम आशियाई सेमेटिक , ख्रिस्ती, ज्यू आणि इस्लाम समाजगट नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले. [२२][२३] इ.स.पू. ५७३ मध्ये ज्यू समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले..[२४][२५] येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.[२६][२७][२८][२९] इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.

भूगोल[संपादन]

केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे.[३०] केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला ५९० कि.मी. (३६७ मैल) किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच पर्वत, खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च शिखर आहे.

केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात.[३०] या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.

A catastrophic flood occurred in Kerala in 1341 CE that drastically modified the terrain and consequently affected the history.[३१] The flood resulted in changing the course of the river Periyar, recession of Arabian Sea by several miles downwards making the Kuttanad region cultivable, closure of the Muziris (Kodungalloor) harbour and creation of a new harbour at Kochi.[३२][३३][३४]

With 120–140 rainy days per year, Kerala has a wet and maritime tropical climate influenced by the seasonal heavy rains of the southwest summer monsoon.[३५]:80 In eastern Kerala, a drier tropical wet and dry climate prevails. Kerala's rainfall averages 3,107 mm annually. Some of Kerala's drier lowland regions average only 1,250 mm; the mountains of eastern Idukki district receive more than 5,000 mm of orographic precipitation, the highest in the state.

During summer, Kerala is prone to gale force winds, storm surges, cyclone-related torrential downpours, occasional droughts, and rises in sea level.[३६]:26, 46, 52 The mean daily temperatures range from 19.8 °C to 36.7 °C.[३०] Mean annual temperatures range from 25.0–27.5 °C in the coastal lowlands to 20.0–22.5 °C in the eastern highlands.[३६]:65

जिल्हे[संपादन]

केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

विभाग संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणती) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
KL AL आलप्पुळा आलप्पुळा २,१०५,३४९ १,४१४ १,४८९
KL ER एर्नाकुळम कोची ३,०९८,३७८ २,९५१ १,०५०
KL ID इडुक्की पैनाव १,१२८,६०५ ४,४७९ २५२
KL KL कोल्लम कोल्लम २,५८४,११८ २,४९८ १,०३४
KL KN कण्णुर कण्णुर २,४१२,३६५ २,९६६ ८१३
KL KS कासारगोड कासारगोड १,२०३,३४२ १,९९२ ६०४
KL KT कोट्टायम कोट्टायम १,९५२,९०१ २,२०३ ८८६
KL KZ कोळिकोड कोळिकोड २,८७८,४९८ २,३४५ १,२२८
KL MA मलप्पुरम मलप्पुरम ३,६२९,६४० ३,५५० १,०२२
KL PL पलक्कड पलक्कड २,६१७,०७२ ४,४८० ५८४
KL PT पतनमत्तिट्टा पतनमत्तिट्टा १,२३१,५७७ २,४६२ ५००
KL TS त्रिश्शूर त्रिश्शूर २,९७५,४४० ३,०३२ ९८१
KL TV तिरुवअनंतपुरम तिरुवअनंतपुरम ३,२३४,७०७ २,१९२ १,४७६
KL WA वायनाड कल्पेट्टा ७८६,६२७ २,१३१ ३६९

अर्थव्यवस्था[संपादन]

संस्कृती[संपादन]

चित्रदालन[संपादन]

राजकारण[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. http://www.hindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm
 2. UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States
 3. TN makes its way to top 5 states in HDI Financial Express -Monday, Mar 24, 2008
 4. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nfhsindia.org नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 5. India Corruption Study — 2005. Transparency International (2005). 2007-11-11 रोजी पाहिले.
 6. K.P. Kannan, K.S. Hari (2002). Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000.
 7. S Irudaya Rajan, K.C. Zachariah (2007). Remittances and its impact on the Kerala Economy and Society (PDF).
 8. "Jobs Abroad Support ‘Model’ State in India", New York Times. 
 9. Dobbie A (2006). India: The Elephant's Blessing. Melrose Press. आय.एस.बी.एन. 1-9052-2685-3. 2009-01-02 रोजी मिळवले. 
 10. Menon AS (1967). A Survey of Kerala History. Sahitya Pravarthaka Cooperative Society. 
 11. George KM (1968). A Survey of Malayalam Literature. Asia Publishing House. 
 12. Oliver Freiberger (2006). Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives. Oxford Uniersity Press. 
 13. Tourism information on districts - Wayanad[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती Official website of the Govt. of Kerala
 14. Kanakasabhai 1997, p. 10
 15. Carving the Buddha [मृत दुवा]. Govt of Kerala. 2009-09-23 रोजी पाहिले.
 16. Aiya VN (1906). The Travancore State Manual. Travancore Government Press, पृ. 210–212. 2007-11-12 रोजी मिळवले. 
 17. Sadasivan 2000, pp. 105-6
 18. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 74.125.153.132 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 19. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Books.google.co.in नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 20. "officialwebsite of". Kerala.gov.in. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ८ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2010-02-25 रोजी पाहिले. 
 21. Iyengar PTS (2001). History Of The Tamils: From the Earliest Times to 600 A.D.. Asian Educational Services. आय.एस.बी.एन. 8-1206-0145-9. 2008-12-29 रोजी मिळवले. 
 22. * Bindu Malieckal (2005) Muslims, Matriliny, and A Midsummer Night's Dream: European Encounters with the Mappilas of Malabar, India; The Muslim World Volume 95 Issue 2
 23. Milton J, Skeat WW, Pollard AW, Brown L (1982-08-31). The Indian Christians of St Thomas. Cambridge University Press, पृ. 171. आय.एस.बी.एन. 0-5212-1258-8. 
 24. De Beth Hillel, David (1832). Travels (Madras publication).
 25. Lord, James Henry (1977). The Jews in India and the Far East; Greenwood Press Reprint; ISBN.
 26. Kerala Syrian Christians, Apostle in India. nasrani.net. 2009-10-25 रोजी पाहिले.
 27. Pope denies St. Thomas came to South India. Hamsa.org. 2009-09-23 रोजी पाहिले.
 28. Medlycott, A E. 1905 "India and the Apostle Thomas"; Gorgias Press LLC; ISBN
 29. Thomas Puthiakunnel, (1973) "Jewish colonies of India paved the way for St. Thomas", The Saint Thomas Christian Encyclopedia of India, ed. George Menachery, Vol. II.
 30. ३०.० ३०.१ ३०.२ त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GOK_2005b नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 31. Kerala / Kochi News : Bringing the Muziris experience back to life. The Hindu (2009-06-22). 2010-02-25 रोजी पाहिले.
 32. Kerela Tourism,Kerala Tour packages,Kerla Tours. Kerelatourism.com. 2010-02-25 रोजी पाहिले.
 33. USA. History of Cochin, Kerala, India - by Nayab Naseer. Helium. 2010-02-25 रोजी पाहिले.
 34. Kaduthuruthy in Kaduthuruthy India. India9.com (2005-06-07). 2010-02-25 रोजी पाहिले.
 35. Chacko T; Renuka G (2002). "Temperature mapping, thermal diffusivity and subsoil heat flux at Kariavattom, Kerala". Proc Indian Acad Sci (Earth Planet Sci). 
 36. ३६.० ३६.१ Brenkert A; Malone E (2003). "Vulnerability and resilience of India and Indian states to climate change: a first-order approximation". Joint Global Change Research Institute.