Jump to content

विजयवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजयवाडा
విజయవాడ
भारतामधील शहर


विजयवाडा is located in आंध्र प्रदेश
विजयवाडा
विजयवाडा
विजयवाडाचे आंध्र प्रदेशमधील स्थान

गुणक: 16°30′30″N 80°38′30″E / 16.50833°N 80.64167°E / 16.50833; 80.64167

देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
जिल्हा कृष्णा जिल्हा
क्षेत्रफळ ६१.८८ चौ. किमी (२३.८९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,३४,३५८
  - घनता १६,९३९ /चौ. किमी (४३,८७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. विजयवाडा शहर आंध्र प्रदेशाच्या मध्य भागात कृष्णा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. विजयवाडा आंध्र प्रदेशचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळा करण्यात आल्यानंतर आंध्रच्या राजधानीसाठी अमरावती नावाचे नवे संकल्पित शहर विजयवाड्याजवळच निर्माण केले जात आहे. ह्यामुळे विजयवाडा प्रदेश आंध्र प्रदेशमधील सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक बनेल.

विजयवाडा आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे वाहतूक केंद्र असून विजयवाडा रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. विजयवाडा विमानतळ शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. चेन्नई-कोलकाता दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५पुणे-मच्छलीपट्टणम दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ९ हे येथील प्रमुख महामार्ग आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]