भुवनेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भुवनेश्वर
भारतामधील शहर
Jaydev vihar.jpg
Rajpath.JPG IITBBS.jpg
ORISSA SECRETARIAT.jpg Dhauilgiri Stupa top.jpg
Rama Mandira Bhubaneswar Odisha1.JPG Lingaraj Temple bbsr8.jpg
भुवनेश्वर is located in ओडिशा
भुवनेश्वर
भुवनेश्वर
भुवनेश्वरचे ओडिशामधील स्थान
भुवनेश्वर is located in भारत
भुवनेश्वर
भुवनेश्वर
भुवनेश्वरचे भारतमधील स्थान

गुणक: 20°16′12″N 85°50′24″E / 20.27°N 85.84°E / 20.27; 85.84गुणक: 20°16′12″N 85°50′24″E / 20.27°N 85.84°E / 20.27; 85.84

देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
जिल्हा खोर्दा जिल्हा
क्षेत्रफळ १३५ चौ. किमी (५२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४८ फूट (४५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,४३,४०२
  - महानगर ८,८६,३९७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


भुवनेश्वर ही भारताच्या ओडिशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओडिशाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूरचंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली. सध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. ओडिशा विधानसभा येथेच स्थित आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख जोडशहरे आहेत. हिंदू धर्मामधील चार धाम ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले जगन्नाथपुरी हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर कोणार्क सूर्य मंदिर ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत.

अनेक सहस्त्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे.

वाहतूक[संपादन]

बिजु पटनायक विमानतळ भुवनेश्वरच्या दक्षिण स्थित असून येथे एअर इंडिया, गोएअरइंडिगो ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात. भुवनेश्वर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. कोलकाता ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५ तसेच राष्ट्रीय महामार्ग २०३ भुवनेश्वरमधूनच जातात.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत