दिमापूर
दिमापूर | |
भारतामधील शहर | |
दिमापूरचे हवेमधून घेतलेले छायाचित्र |
|
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/नागालॅंड" nor "Template:Location map नागालॅंड" exists.दिमापूरचे नागालॅंडमधील स्थान |
|
देश | ![]() |
राज्य | नागालॅंड |
जिल्हा | दिमापूर |
क्षेत्रफळ | १२१ चौ. किमी (४७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४७६ फूट (१४५ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,२२,८३४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
दिमापूर हे भारत देशाच्या नागालॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. दिमापूर शहर नागालॅंडच्या पश्चिम भागात राजधानी कोहिमाच्या ६८ किमी वायव्येस आसाम राज्याच्या सीमेवर वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले दिमापूर ईशान्य भारतामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.
राष्ट्रीय महामार्ग ३९ व राष्ट्रीय महामार्ग ३६ हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग दिमापूरमधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ आहे. दिमापूर रेल्वे स्थानक गुवाहाटी-दिब्रुगढ रेल्वेमार्गावर स्थित असून दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस, ब्रह्मपुत्रा मेल, कामरूप एक्सप्रेस, गुवाहाटी-जोरहाट जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे रोज थांबतात.
येथे हिडिंबा नावाचा वाडा आहे.त्यात बुद्धिबळाच्या आकाराच्या सोंगट्या आहेत. रामायणातील भीमाची पत्नी हिडिंबा ही इथली राजकुमारी होती असे म्हणतात.त्यामुळे या शहरास हिडिंबानगारी असेही नाव आहे.[ संदर्भ हवा ] या ठिकाणी डिमाशा जातीचे लोक राहतात जे स्वतःला हिडिंबाचे वंशज मानतात.भीमपुत्र घटोत्कच व भीम येथे या विशाल सोंगट्यांच्या सहाय्याने बुध्दिबळ खेळत असे, असे म्हणतात. त्यावरुन ते किती बलवान होते याचा अंदाज करता येतो. इतिहासकारांच्या मते या सोंगट्या म्हणजे तेथील कछरी राज्याचे अवशेष आहेत. कछरी ही दिमापूरची फार पूर्वीच्या काळातली राजधानी होती. हे एक छान पर्यटनस्थळ आहे.[१]
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर "बुद्धिबळाचा विशाल पट" Check
|दुवा=
value (सहाय्य). ०६/११/२०१६ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)