छत्तीसगढ
?छत्तीसगढ भारत | |
— राज्य — | |
| |
गुणक: 21°16′N 81°36′E / 21.27°N 81.60°E | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,३५,१९४ चौ. किमी |
राजधानी | रायपूर |
मोठे शहर | रायपूर |
जिल्हे | १८ |
लोकसंख्या • घनता |
२,०७,९५,९५६ (१७ वा) (२००१) • १०८/किमी२ |
भाषा | छत्तीसगढी, हिंदी |
राज्यपाल | आनंदीबेन पटेल |
मुख्यमंत्री | भूपेन बगेल |
स्थापित | १ नोव्हेंबर २००० |
विधानसभा (जागा) | Unicameral (९०) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-CT |
संकेतस्थळ: छत्तीसगढ सरकार संकेतस्थळ |
गुणक: 21°16′N 81°36′E / 21.27°N 81.60°E
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
छत्तीसगढ हे नाव १५ व्या शतकात परिसरातील ३६ गडांवरून पडले असावे असा अंदाज आहे. यापैकी रायपूर आणि रतनपूर क्षेत्रात प्रत्येकी १८ गड आहेत. या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य-दक्षिणकोशल या नावाने ओळखले जात होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात छत्तीसगढ राज्य मध्य प्रांताचा भाग होते. त्यावेळी येथे बस्तर, कांकेर, नांदगाव, खैरागढ, छुईखदान, कावर्धा, रायगढ, सक्ती, सारंगगढ, सुरगुजा, जशपूर, कोरिया, चांगभरवार आणि उदयपूर संस्थान ही १४ छोटी संस्थाने होती. तर रायपूर, बिलासपूर, दुर्ग ही खालसा राज्ये होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली छत्तीसगढचा समावेष मध्य भारतात करण्यात आला. १९५० साली मध्य भारतचे नाव बदलून ते मध्य प्रदेश करण्यात आले. १ नोव्हेंबर १९५६ ला एकदा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर एकदा मध्य प्रदेश राज्याची नवी रचना करण्यात आली. या प्रत्येक वेळी छत्तीसगढ राज्य मध्य प्रदेशचाच भाग होते. १ नोव्हेंबर २००० ला छत्तीसगढ नावाच्या नव्या, २६ व्या, राज्याची रचना करण्यात आली.
भूगोल[संपादन]
छत्तीसगढ राज्य आकारमानाच्या दृष्टीने भारतातील ९ व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० कि. मी. असून उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ४३५ कि. मी. आहे.
सीमा[संपादन]
छत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत.
जिल्हे[संपादन]
छत्तीसगढ राज्यात १६ जिल्हे आहेत. यावरील विस्तृत लेख येथे आहे.
वनसंपदा[संपादन]


राज्यात ३ राष्ट्रीय उद्याने आणि १० अभयारण्ये आहेत. यावरील माहितीसाठी छत्तीसगढमधील राष्ट्रीय उद्याने आणि छत्तीसगढमधील अभयारण्ये येथे भेट द्या.