Jump to content

कलबुर्गी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुलबर्गा या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?कलबुर्गी (गुलबर्गा)

कर्नाटक • भारत
—  शहर  —
Map

१७° २०′ ००″ N, ७६° ५०′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४५४ मी
जिल्हा कलबुर्गी जिल्हा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 585101
• +त्रुटि: "९१ ८४७२" अयोग्य अंक आहे
• केए-३२

कलबुर्गी भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर कलबुर्गी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. कलबुर्गीपासून हैदराबाद सुमारे २०० कि.मी. तर बंगळूर दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे.

इतिहास

[संपादन]

गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून, निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इ.स.च्या १४व्या शतकातील हसन गंगू बह मनशाह या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या बहामनी सुलतानशाहीची राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.

धर्म

[संपादन]

कलबुर्गी आणि त्याचा परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्धीस आले. कलबुर्गी शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि ख्वाजा बंदे नवाझ दर्गा प्रसिद्ध आहे. नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील कलबुर्गीचे धार्मिक महत्त्व वाढवतो.

भाषा

[संपादन]

कन्नड भाषेसह कलबुर्गीमध्ये प्रामुख्याने उर्दू, मराठी बोलल्या जातात.

दळणवळण

[संपादन]

कलबुर्गी रेल्वे स्थानक हे मुंबई-हैदराबाद-चेन्नई-बंगळूर मार्गावरील मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. कलबुर्गी शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेले आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत