Jump to content

अकोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख अकोला शहराविषयी आहे. अकोला जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?अकोला

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° ४४′ ००″ N, ७७° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१२८ चौ. किमी
• २८७ मी
जिल्हा अकोला
तालुका/के अकोला
लोकसंख्या
घनता
५,३७,१४९ (२०११)
• ४,२००/किमी
भाषा मराठी,वर्हाडी[१]
महापौर अर्चना जयंत मसने[१]
उपमहापौर राजेंद्र गिरी[१]
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४००१
• +०७२४
• MH-३०
किल्ला

अकोलाAkola.ogg उच्चारण हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या विदर्भातले एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर अक्षांश व ७६.५९ पूर्व रेखांश आहे. हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे. अकोला शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.[६] जातो. जिल्ह्यात बाळापूर, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, अकोला असे एकूण सात तालुके आहेत.

नाव[संपादन]

अकोला शहराला त्याचे नाव अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून पडलेले आहे.

इतिहास[संपादन]

१ जुलै १९९८ला अकोला जिल्ह्य़ापासून वाशिम हा जिल्हा निर्माण झाला.

भूगोल[संपादन]

असदगड किल्ला[संपादन]

असदगड हा नरनाळा व बाळापूर किल्ल्यांसह अकोला जिल्ह्यातला एक प्रमुख किल्ला आहे.

पेठा[संपादन]

१. हरिहरपेठ

२. जठारपेठ

३. रामदासपेठ

४. देशमुखपेठ

हरिहरपेठ हे जुन्या शहर परिसर भागात असून इथे जुनी वस्ती आहे. येथील पुरातन विठ्ठल मंदिर फार प्रसिद्ध आहे.

उपनगरे[संपादन]

अकोला शहराचा विस्तार मागील १० वर्षांत खूप झाला असून शहराची वाढ उपनगरांत व आजूबाजूच्या खेड्यांत होत आहे. गोरक्षण रोड, कौलखेड, खदान, सिंधी कॅंप ही अकोला शहराची उपनगरे आहेत. शिवाय बाजूची गुढधी, उमरी, शिवनी, शिवर, खरप, न्यू तापडिया नगर, डाबकी, भौरद ही खेडी संपूर्णपणे निवासी झालेली आहेत. ही सर्व खेडी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली असून अकोला शहराची लोकसंख्या अंदाजे ६.५ लाखाच्या आसपास आहे.

पर्यटन[संपादन]

अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगडचा मारोती, काटेपूर्णाची चंडिकादेवी, पातूरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. संत गजानन महाराजांचे शेगांव येथील मंदिर अकोल्याहून ५० किमी अंतरावर आहे. अकोल्यातील राजराजेश्वराचे मंदिरातील शिव हे अकोल्याचे ग्रामदैवत असून श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.येथील लोकं पूर्णा नदीवरून कावडीने पाणी आणून मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करतात.

नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे. नरनाळा किल्ला व अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत खूप वाढली असून जिल्हा प्रशासनाने दरवर्षी भरणारा 'नरनाळा महोत्सव' सुरू केला आहे. वारी भैरवगड येथून जवळच आहे.ह्याशिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य आणि बार्शीटाकळी तालुक्यात चिंचोली ह्या गावापासून 1 किमी अंतरावर रुद्रायणी मातेचे पहाडावर वसलेले 365 पायऱ्या असलेले पुरातन मंदिर आहे व येथील मोठे धरण सुद्धा लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.तसेच चिंचोली येथील लॉर्ड बुद्ध यांचा गोल्डन पॅगोडा सुद्धा सद्ध्या प्रचलित आहे. इथे शासकीय निवासस्थाने व व्यावसायिक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

हवामान[संपादन]

उष्ण व विषम हवामानाचा हा जिल्हा असल्याने उन्हाळा अतिशय उष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो. जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा असून हा जिल्हा तापी- पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.

नद्या[संपादन]

जिल्ह्यातील इतर नद्या - उमा , काटेपूर्णा, मोर्णा, शहानूर, मन, आस, विश्वामित्री, निर्गुणा, गांधारी, आणि वान.

काटेपूर्णा, उमा , शहानूर आणि वान या नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत.

वाहतूक[संपादन]

मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गावरील; तसेच अजमेर-पूर्णा या मार्गावरील अकोला हे महत्त्वाचे जंक्शन आहे. हे रेल्वेने मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, नांदेड, इंदूर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेवरील पूर्णा-अकोला हा मार्ग ४ वर्षापूर्वी ब्रॉडगेज करण्यात आला आहे. ह्या मार्गावरून आता अकोला-पूर्णा, अकोला-काचीगुडा, नागपूर-कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. पण अजूनही अकोला-खांडवा हा रेल्वेमार्ग मीटर गेजवरच आहे. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यास चेन्नई-दिल्ली मार्गावरील सर्वांत कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या ह्या मार्गावरून अकोला-महू, अकोला-खांडवा, अकोला-जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात.

२००९मध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर शिवनी-शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यत: औद्योगिक परिसरातील मालवाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. ह्या मार्गावरून अकोला-धुळे, अकोला-नागपूर आणि अकोला-नांदेड अशा पॅसेन्जर ट्रेन्स सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

अकोला हे राष्ट्रीय महामार्ग ६ वर असून त्याद्वारे ते मुंबई, कोलकाता, सुरत ह्या शहरांशी जोडलेले आहे. हा मार्ग ४ पदरी करण्याचा प्रस्ताव मान्य झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय अकोला-हैदराबाद हा नांदेड मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. इंदूर-अकोला-नांदेड-हैदराबाद हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे.

अकोला इथे हवाई वाहतुकीसाठी विमानतळ आहे. सध्या विस्तारीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी लागणारी जमीन कृषिविद्यापीठाकडून मिळविण्यात अडचणी येत आहेत. हे विस्तारीकरण झाल्यास पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ अतिशय उपयोगी ठरणार आहे.

जैवविविधता[संपादन]

अर्थकारण[संपादन]

बाजारपेठ[संपादन]

अकोला ही परिसरातील फार पूर्वीपासून एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कापसाची, शेती अवजारांची, सोन्याची आणि गुरांची अशा प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. जवळच्या वाशीम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या परिसरातील लोक अकोल्यातूनच मालाची खरेदी करतात.

शहरात सोन्याची सुद्धा मोठी बाजारपेठ असून अख्ख्या पश्चिम विदर्भातील लोक जुन्या-नवीन पद्धतीचे दागिने खरेदीसाठी इथे येत असतात. त्यामुळे अकोला शहरात व्यापारी वर्ग फार पूर्वीपासून वास्तव्यास आहे. विदर्भ प्रदेशातील नागपूर पाठोपाठ अकोला ही मोठी बाजारपेठ गणली जाते.

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

अकोला शहरात नागरी प्रशासन अकोला महापालिकेतर्फे पाहिले जाते. त्यामधे ७१ वार्ड समाविश्ट आहेत. अकोला महापालिकेतर्फे AMT या अंतर्गत शहरी बससेवा पुरविली जाते. अकोला महापालिकेत शहराला लागून असलेली उमरी, गुढधी, शिवनी, शिवर, डाबकी, खरप, खदान, भोरद, बाभुळगाव इत्यादी खेडी समाविष्ट आहेत.मात्र अकोला शहरात निवासी सोयी चांगल्या नाहीत

जिल्हा प्रशासन[संपादन]

अकोला जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्ह्यासाठी असणारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय येथे आहे.

   सध्या अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी IAS 

अजित कुंभार हे आहेत.

वैद्यकीय सुविधा[संपादन]

अकोला शहर येथिल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. अकोला शहरातले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वोपचार रुग्णालय आहे. तसेच विभागीय वैद्यकीय उपसंचालकाचे कार्यालय अकोल्यात असून पश्चिम विदर्भातील वैद्यकीय सुविधांचा कारभार येथून चालतो. अकोला शहरातील इतर रुग्णालये व इस्पितळे खालीलप्रमाणे:

- अकोला क्रिटिकल केर युनिट

- अकोला नेत्र हॉस्पिटल

- ओझोन हॉस्पिटल

- दमाणी नेत्र रुग्णालय

- लेडी हार्डिंग्ज स्त्री रुग्णालय

- संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल

- आयकॉन हॉस्पिटल

तसेच इथे नर्सि॑ग महाविद्यालय, दंतशिक्षण महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व होमिओपॅथिक महाविद्यालय आहे. अकोला शहर येथील Elizarov Technique आणि IVF टेक्निकसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तसेच येथील संत तुकाराम हॉस्पिटल मध्ये गरीब रोगपीडितांसाठी स्वस्त दरांत उपचार केले जातात. अकोला येथील जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात परावर्तित झाल्यापासून इथे वेगळे जिल्हा रुग्णालय होणे जरुरीचे होते, परंतु ते झाले नाही. अकोला जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर निर्माण करावे ही जिल्ल्ह्यतील गरीब जनतेची वाढती मागणी आहे.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

अकोला शहारातील वाहतूक व्यवस्था महापालिकेद्वारे चालविल्या जाणाऱ्या AMT बसेसद्बारे चालविले जाते. AMT बसेस शहरातील वाहतुकीसाठी सर्वांत स्वस्त पर्याय आहे. ह्याशिवाय रिक्षा व खासगी बसेस शहरात वाहतूक करतात.

संस्कृती[संपादन]

शेतीव्यवसाय[संपादन]

जिल्ह्यातील जमीन काळी, कसदार (रेगूर) आहे. मुख्य पीक कापूस व तेलबिया आहे. खरीप ज्वारी उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे. अकोला जिल्ह्यातील शेतीचे ढोबळमानाने ३ गटांमध्ये वर्गीकरण करता येईल :

  • अति उत्तरेकडील अकोट आणि तेल्हारा तालुक्यांचा बागायती भाग
  • मध्यभागातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्टा
  • दक्षिणेकडील बार्शी टाकळी आणि पातूर तालुक्यांतील डोंगराळ भागातील शेती

यांपैकी खारपान पट्टा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा आहे.

  • बार्शिटाकळी तालुक्यातील उजळेश्वर गावातील शेती ही सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेमूळे संपन्न झाली आहे.त्यामूळे उजळेश्वरवासी सुखावले आहेत. उजळेश्वर हे गाव जलसिंचनाच्या बाबतीत तालुक्यात आघाडीवर आहे.

इतर[संपादन]

पारस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहे.

अकोला जिल्ह्याची विभागणी होऊन वाशीम हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. अकोला जिल्ह्याचे एकूण ७ तालुके आहेत १) अकोला २) मुर्तिजापूर ३) बार्शीटाकळी ४) बाळापूर ५) पातूर ६) तेल्हारा ७) अकोट

शिक्षण[संपादन]

प्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]

महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]

अकोला शहरातील महत्त्वाची महाविद्यालये खालीलप्रमाणे सांगता येतील:

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यलय, अकोला

२. अकोला इंजिनिअरिंग कॉलेज, अकोला (श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालीत)

३. भोंसला कॉलेज ऑफ इंजीनीअरींग ॲन्ड रिसर्च, अकोला

४. श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी, अकोला


५. कृषी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापिठ, अकोला

६. अन्न प्रक्रिया अभियान्त्रीकी महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोला

७. स्नातकोत्तर पशू वैद्यकीय महविद्यालय, अकोला

८.श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला

९. श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, अकोला.

१० . स्व. पांडुरंग पाटील नर्सिंग (B.Sc) कॉलेज (कान्हेरी सरप) अकोला

११ . गीतादेवी खंडेलवाल फार्मसी कॉलेज डाबकी रोड,अकोला.

१२. भिकमचंद खंडेलवाल मुलांची शाळा व मोहरीदेवी खंडेलवाल मुलींची शाळा, गोडबोले प्लॉट,अकोला.

१३. शंकरलाल खंडेलवाल आर्ट,सायन्स व कॉमर्स कॉलेज,अकोला.

१४. नॅशनल मिलिटरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, गायगाव अकोला.

संशोधन संस्था[संपादन]

अकोल्यात ३ मोठ्या संशोधन संस्था आहेत.

१. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ: विद्यापीठात विदर्भातील शेतीजीवनाचा अभ्यास व विविध पिकांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाने आतापर्यंत अनेकविध प्रकारची वाणे व शेती अवजारे संशोधित केली आहेत.

२. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ, अकोला

३. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला

विशेष[संपादन]

या शहरात बाबुजी देशमुख व्याख्यानमाला चालविली अकोला जिल्हा हे अभाविप चे मोठे केंद्र आहे

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]