Jump to content

देवास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवास
भारतामधील शहर

देवास रेल्वे स्थानक
देवास is located in मध्य प्रदेश
देवास
देवास
देवासचे मध्य प्रदेशमधील स्थान
देवास is located in भारत
देवास
देवास
देवासचे भारत३मधील स्थान

गुणक: 22°57′36″N 76°3′36″E / 22.96000°N 76.06000°E / 22.96000; 76.06000

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
जिल्हा देवास जिल्हा
महापौर सुभाष शर्मा [१]
समुद्रसपाटीपासुन उंची १,७५५ फूट (५३५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८९,५५०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


देवास हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यामधील एक शहर व देवास जिल्ह्याचे मुख्यालय आहे. देवास मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातील माळवा भौगोलिक प्रदेशात भागात इंदूरच्या ३७ किमी ईशान्येस तर उज्जैनच्या ३५ किमी आग्नेयेस वसले आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश राजवटीदरम्यान देवास हे एक स्वतंत्र मराठा संस्थान होते. सध्या २.९ लाख लोकसंख्या असलेले देवास मध्य प्रदेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देवास मध्य प्रदेश राज्याचे औद्योगिक नगर आहे. भारत सरकारचे बैंक नोट मुद्रणालय देवास नगरात स्थित आहे.

देवास शहराला त्याचे नाव शहरात स्थित चामुण्डा पर्वतामूळे प्राप्त झाले, ह्या पर्वताला टेकरी (३०० फिट उंची) ह्या नावाने ओळखले जाते. पर्वतावर देवीचे मन्दिर असल्या मुळे देवी वासिनी आणि ह्याच्या पासून देवास (देव-वास) हे नाव प्राप्त झाले असू शकते. शहराचे संस्थापक देवासा बनिया यांच्या नावा पासूनही शहराला त्याचे नाव प्राप्त झाले असू शकते.[२]

इतिहास

[संपादन]

पूर्वी देवास हे नगर इंग्रज शासित भारताच्या दोन राघराण्यांची राजधानी होती. मूळ देवास राज्याची स्थापना अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. मराठांच्या पंवार (पुआर) कुळातल्या तुकाजी राव (वरिष्ठ) आणि जिवाजी राव (कनिष्ठ) ह्यांनी ह्याची स्थापना केली.

वाहतूक

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-22 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2017-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-22 रोजी पाहिले.