बंगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बंगळूर
कर्नाटक • भारत
—  मेट्रो  —
चित्रात वरून यूबी सिटी, इन्फोसिस, लालबाग ग्लास हाऊस, विधान सौध आणि खाली बागमाने टेकपार्क
चित्रात वरून यूबी सिटी, इन्फोसिस, लालबाग ग्लास हाऊस, विधान सौध आणि खाली बागमाने टेकपार्क
गुणक: 12°58′13″N 77°33′37″E / 12.970214, 77.56029
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
७४१ चौ. किमी (२८६ चौ. मैल)
• ९२० m (३,०१८ ft)
प्रांत बायालु सीमे
जिल्हा बंगळूर शहर
लोकसंख्या
घनता
मेट्रो
५२,८०,००० (३ रा) (२००७)
• ७,१२६/km² (१८,४५६/sq mi)
• ५
आयुक्त डॉ.एस. सुब्रह्मण्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ५६०
• +80
• INBLR
• KA 01, KA 02, KA 03, KA 04, KA 05, KA 41, KA 50, KA 51, KA 53
संकेतस्थळ: बंगळूर महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 12°58′13″N 77°33′37″E / 12.970214, 77.56029 बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बँगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ साली कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाब बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगलोरचा लौकिक आहे. हे शहर बंगलोरबंगलोर ग्रामीण अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.

बंगलोर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.

इतिहास[संपादन]

१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला

बेंगलोरचा उल्लेख इ.स.च्या नवव्या शतकातील एका शिलालेखात आढळतो, इ.स. १०२४च्या सुमारास चोळ साम्राज्यात हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर होयसळ, विजयनगर साम्राज्य इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना इ.स. १५३७ साली पहिला केंपेगौडा यांने चिकलीदुर्ग आणि बसवणगुडी येथे मंदिरे बांधून केली. दुसर्‍या केंपेगौडाने ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. इ.स. १६३८ साली रणदुल्लाखान आणि शहाजीराजे भोसले यांनी तिसर्‍या केंपेगौडास हरवून बंगलोर आदिलशाही मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. इ.स. १६८७ साली कासीमखानाने मोगलांचे सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र व्यंकोजी भोसले याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख म्हैसूरचा राजा चिक देवराजा वोडेयार याला विकली. दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार हैदर अली याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. इ.स. १७९१ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हैदर अलीचा पुत्र टिपू सुलतान यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर इ.स. १९४७ साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले.

भूगोल[संपादन]

उल्सूर लेक

बंगळूर शहर कर्नाटक राज्याच्या आग्नेय भागात आहे. समुद्रसपाटीपासून ९२० मी (३,०१८ फूट) उंचीवर आहे. बंगळूरमध्ये नदी अशी नाही, पण बरीच तळी आहेत. इ.स.च्या सोळाव्या शतकात बंगलोरचा शासक केंपेगौडा याने शहराच्या पाणी समस्येवर उपाययोजनेसाठी तळ्यांची निर्मिती केली.

बंगळूर शहरातील तळी[संपादन]

 • आगरा तलाव
 • उल्सूर तलाव
 • जागरणहल्ली तलाव
 • पुटेनहल्ली तलाव
 • बेलंदूर तलाव
 • मडिवळा तलाव
 • लालबाग तलावहवामान[संपादन]

बेंगळूर समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे, येथील हवामान आल्हाददायक व अनुकूल आहे. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना असतो, तर एप्रिल उष्ण असतो. बंगळुराचे सर्वोच्च तापमान ३८.९°सेल्सियस इ.स. १९३१ साली नोंदले गेले, तर नीचांकी तापमान ७.८ °सेल्सियस इ.स. १८८४ साली नोंदले गेले.

हवामान तपशील: Bangalore
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 32.4
(90.3)
35.5
(95.9)
37.4
(99.3)
38.9
(102)
38.3
(100.9)
38.1
(100.6)
32.1
(89.8)
31.4
(88.5)
33.2
(91.8)
32
(90)
31
(88)
30.2
(86.4)
३८.९
सरासरी कमाल °से (°फॅ) 27.6
(81.7)
30.2
(86.4)
32.9
(91.2)
34.1
(93.4)
33.3
(91.9)
29.4
(84.9)
28.1
(82.6)
27.5
(81.5)
28.3
(82.9)
28.0
(82.4)
27.0
(80.6)
26.2
(79.2)
२९.३८
(८४.८९)
सरासरी किमान °से (°फॅ) 15.3
(59.5)
17.2
(63)
19.6
(67.3)
21.8
(71.2)
21.5
(70.7)
20.2
(68.4)
19.8
(67.6)
19.6
(67.3)
19.7
(67.5)
19.4
(66.9)
17.7
(63.9)
16.0
(60.8)
१८.९८
(६६.१७)
विक्रमी किमान °से (°फॅ) 7.8
(46)
9.4
(48.9)
12.9
(55.2)
14.8
(58.6)
16.7
(62.1)
15.4
(59.7)
15
(59)
15.5
(59.9)
14.8
(58.6)
11
(52)
9.3
(48.7)
7.6
(45.7)
७.६
पर्जन्य मिमी (इंच) 1.8
(0.071)
7.9
(0.311)
7
(0.28)
40
(1.57)
110.2
(4.339)
89.1
(3.508)
108.9
(4.287)
142.5
(5.61)
241
(9.49)
154.5
(6.083)
54.1
(2.13)
17.5
(0.689)
९७४.५
(३८.३६६)
% आर्द्रता style="background:#1919FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|60

style="background:#3838FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|52

style="background:#5252FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|45

style="background:#3B3BFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|51

style="background:#1919FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|60

style="background:#0000EA;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|72

style="background:#0000DB;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|76

style="background:#0000CF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|79

style="background:#0000DB;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|76

style="background:#0000E6;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|73

style="background:#0000F2;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|70

style="background:#0000F9;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|68

style="background:#0505FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|६५.२
पावसाचे दिवस style="background:#FCFCFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.2

style="background:#F8F8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.5

style="background:#F5F5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.8

style="background:#D8D8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3

style="background:#A9A9FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.9

style="background:#B2B2FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6

style="background:#A3A3FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.4

style="background:#8383FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10

style="background:#7B7BFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10.3

style="background:#9D9DFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.9

style="background:#CDCDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.9

style="background:#EBEBFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|1.6

style="background:#C1C1FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|५८.५
सूर्यप्रकाश (तास) style="background:#E6E600; font-size:85%;

"|263.5

style="background:#E8E800; font-size:85%;

"|248.6

style="background:#E8E800; font-size:85%;

"|272.8

style="background:#E6E600; font-size:85%;

"|258

style="background:#E1E100; font-size:85%;

"|241.8

style="background:#C0C022; font-size:85%;

"|138

style="background:#B2B279; font-size:85%;

"|111.6

style="background:#B3B370; font-size:85%;

"|114.7

style="background:#C3C311; font-size:85%;

"|144

style="background:#CECE00; font-size:85%;

"|173.6

style="background:#D6D600; font-size:85%;

"|189

style="background:#DADA00; font-size:85%;

"|211.8

style="background:#D7D700; font-size:85%;
border-left-width:medium"|२,३६७.४
संदर्भ क्र. १: India Meteorological Department,[१] NOAA (1971–1990)[२]
संदर्भ क्र. २: HKO (sun only, 1971–1990)[३]

अर्थकारण[संपादन]

बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. वालचंद हिराचंद यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.

आय.टी.पी.एल. बेंगळूर

बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली टेक्सास इंस्ट्रुमेंट्स कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. इन्फोसिस, विप्रो टेक्नॉलॉजीज इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.

प्रशासन[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

वाहतूक व्यवस्था[संपादन]

बी.एम.टी.सी. वोल्वो बस

रस्तेवाहतूक[संपादन]

मॅजेस्टिक हे मुख्य बस स्थानक आहे. बंगळूर मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीच्या बसेस प्रवाश्यांची शहरांतर्गत वाहतूक करतात. ऑटोरिक्षा आणी खासगी बससेवाही प्रचलित आहेत.

रेल्वे वाहतूक[संपादन]

मुख्य रेलवे स्टेशन मॅजेस्टिकजवळ आहे.

विमान वाहतूक[संपादन]

केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. शिवाय भारतीय वायुसेनेचा एक विमानतळ बंगलोरमध्येच येलहंका येथे आहे.

संस्कृती[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

बंगळूरमधील धर्म
टक्के
हिंदू
  
79.4%
इस्लाम
  
13.4%
ख्रिश्चन
  
5.8%
जैन
  
1.1%
इतर†
  
1%
धर्मानुसार लोकसंख्या
शीख (<०.१%) आणि बौद्ध (<०.१%) धरून.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा बंगळुरातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. चिन्नस्वामी स्टेडीयममध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. येथून राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील जोशी, व्यंकटेश प्रसाद इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू भारतीय क्रिकेटजगतास लाभले आहेत.

पर्यटन[संपादन]

लाल बागेमधील काचघर
 • इस्कॉन मंदिर
 • कबन पार्क
 • टिपू महाल
 • नंदी हिल
 • बंगळूरचा किल्ला
 • बाणेरघट्टा उद्यान
 • बसवणगुडीचे नंदी मंदिर
 • लाल बाग
 • वंडरला पार्क
 • विधान सौधा

शिक्षणसंस्था[संपादन]

भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर

इ.स. १९०९ साली भारतीय विज्ञान संस्थेची स्थापना येथे झाली.

बंगळूर शहरातील उपनगरे[संपादन]

 • इंदिरानगर
 • कोरमंगल
 • जयनगर
 • जयप्रकाश नारायण नगर
 • डोमलूर
 • मल्लेश्वरम
 • मारतहळ्ळी
 • शिवाजीनगर

मुख्य रस्ते[संपादन]

 • ब्रिगेड रोड
 • महात्मा गांधी रोड
 • विधान सौधा रोड


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
 1. Bengaluru Climatological Table 1971-2000. Indian Meteorological Department. 30 September 2012 रोजी पाहिले.
 2. Bangalore Climate Normals 1971–1990. National Oceanic and Atmospheric Administration. 24 December 2012 रोजी पाहिले.
 3. Climatological information for Bangalore, India. Hong Kong Observatory. 4 May 2011 रोजी पाहिले.