कल्याण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कल्याण
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 19°14′28″N 73°08′11″E / 19.24111°N 73.13639°E / 19.24111; 73.13639
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा ठाणे
लोकसंख्या ११,९४,००० (२००१)
महापौर सौ.कल्याणी पाटील
उपमहापौर श्री राहुल दामले
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०१
• +०२५१
• एम एच - ०५

गुणक: 19°14′28″N 73°08′11″E / 19.24111°N 73.13639°E / 19.24111; 73.13639

कल्याण हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोबिंवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ३० किमी अंतरावर आहे.

थोडक्यात ओळख[संपादन]

Crowd outside Kalyan Junction..jpg

इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. कल्याण हे नाव फार पूर्वीपासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. इ.स. १०५० मधे सुद्धा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इ.स.१६५७ साली कल्याण बंदरातच केली होती. याच कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून शिवाजी महाराजाच्या सैन्याच्या हातात सापडली असताना श्री शिवाजी महाराजांनी तिला मानसन्मानासहित परत धाडले होते.

कल्याण व डोंबिवली या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी[ संदर्भ हवा ] असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६[ संदर्भ हवा ] असून (२००१च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३[ संदर्भ हवा ] किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी[ संदर्भ हवा ] आहे.

कल्याण शहराचा भूगोल[संपादन]

कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडीवसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ऒद्यॊगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.

मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहॆ.

कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. बोरीबंदर येथून सुरू होणारी मध्य रेल्वेला कल्याण जंक्शन येथे कसार्‍यामार्फत उत्तर भारतात जाणारा फाटा फुटतो. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाला फार महत्त्व आहे. मद्रासहून, तसेच उत्तर भारतातून येणार्‍या मध्य रेल्वेवरील सर्व आगगाड्या व जलद आणि धीम्या लोकल्स कल्याणला थांबतात.

कल्याण शहराची माहिती[संपादन]

कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. पश्चिम कल्याणचे पूर्व कल्याणपेक्षा अधिक शहरीकरण झाले आहे.

कल्याण परिसरातील आकर्षक ठिकाणे[संपादन]

 1. काळा तलाव, कल्याण पश्चिम
 2. कोंडेश्वर, बदलापूर
 3. गणेश घाट
 4. गणेशमंदिर, टिटवाळा
 5. दुर्गाडी किल्ला
 6. लोणाड लेणी
 7. शिवमंदिर, अंबरनाथ
 8. शिवमंदिर, खिडकाळी
 9. विठ्ठल मंदिर, शहाड
 10. मलंगगड
 11. मेट्रो जंक्शन मॉल

शाळा आणि महाविद्यालये[संपादन]

शाळा

 • सुभेदार वाडा( शिवकालिन ऎतिहासिक पाश्व्रभुमी )
 • कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल
 • आयडियल इंग्लिश हायस्कूल
 • गणेश विद्या मंदिर
 • गायत्री विद्यालय
 • बिर्ला स्कूल
 • मॉडेल इंग्लिश हायस्कूल
 • रॉयल हायस्कूल
 • साई इंग्लिश हायस्कूल
 • सेंट्रल रेल्वे स्कूल
 • न्यू हायस्कूल सुभेदारवाडा
 • सम्राट अशोक स्कूल


महाविद्यालये

 • आर.के. ज्युनियर कॉलेज
 • के.एम. अग्रवाल कॉलेज
 • मॉडेल कॉलेज
 • बिर्ला कॉलेज
 • शेठ हिराचंद कॉलेज
 • साकेत कॉलेज
 • सोनावणे कॉलेज
 • हिंदी ज्युनियर कॉलेज
 • सेंट्रल रेल्वे ज्युनियर कॉलेज

लोकसंख्या विश्लेषण[संपादन]

कल्याण मधील धर्म
धर्म टक्केवारी
हिंदू
  
73.2%
मुस्लिम
  
14.8%
बौध्द
  
8.7%
ख्रिस्ती
  
1.4%
जैन
  
1.7%
इतर†
  
0.2%
धर्माचे विभाजन
†<लहान>समावेश शीख (0.2%), बौध्द (<0.2%).</लहान>