Jump to content

धेमाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धेमाजी हे भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. ते धेमाजी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. धेमाजी गाव ब्रम्हपुत्रा नदीच्या उत्तरेकडे वसलेले आहे. १४ ऑक्टोबर १९८९ साली धेमाजी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. २०११ सालच्या जनगणनेनुसार धेमाजी या गावाची लोकसंख्या १२८१६ एवढी आहे. या लोकसंख्येतील पुरुष लोकसंख्या ५१% असून महिला लोकसंख्या ४९% आहे. गावाची साक्षरता ९२% आहे. पुरुष साक्षरता ९४% असून महिला साक्षरता ८९% आहे.[]

भौगोलिक स्थान

[संपादन]

धेमाजी या गावाचे अक्षांश २७.४८ उत्तर आणि रेखांश ९४.५८ पूर्व असून हे गाव समुद्रसपाटीपासून ९१ मिटरवर (२९८ फूट) उंचीवर वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश असून या गावच्या पश्चिमेकडे लखीमपूर हा जिल्हा आहे.

इतिहास

[संपादन]

धेमाजी जिल्ह्याच्या ठिकाणी १२ व्या शतकात अहोम राजानी त्यांची राजधानी वसविली. अजूनही त्या काळातील घुगुआ डोल, मा मणिपुरी ठाण अशा वास्तूंचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या राजांनी ह्या भागात सतत पुराचे पाणी येत राहिल्याने येथून राजधानी हलवली. यानंतर येथे ४०० वर्षे चुतीया घराण्याची राजवट होती. तसेच या भागाला १९६२ चेभारत चीन युद्ध, २००४ मधले उल्फा दहशतवाद्यांनी केलेले बॉम्बस्फोट अशा घटनांचे संदर्भ आहेत.

समाजजीवन

[संपादन]

या भागात मिसिंग, सोनोवाल कचारी, देओरी, लालुंग या जमातीचे लोक मूळ रहिवासी आहेत. त्यामुळे येथील संस्कृतीत विविधता आहे. तीच विविधता उत्सव, रूढी, कपडा, राहणे, खाणे आणि भाषेत दिसून येते. येथील स्त्रिया अतिशय कुशल विणकर आहेत. स्त्रियांचे नैसर्गिक रंगाचे ज्ञान अतिशय चांगले असून कपडे विणण्यासाठी त्या स्वतः शेतात कापूस पिकवून त्याचा धागा काढून कपडे विणतात. बालपणापासून येथे मुलीना कपडा विणण्याचे शिक्षण मिळते. येथील मुख्य सण बिहू असून तो तीन प्रकाराने तीन वेगळ्या वेळी सादर होतो. []

दळणवळण

[संपादन]

धेमाजी या गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने येथे रस्त्यावरील अनेक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. येथून जवळचे रेल्वेस्थानक हे धेमाजी रेल्वे स्थानक आहे. येथून रेल्वे ही गुवाहाटी आणि मुरकॉंग सिलेक ही दोन ठिकाणे जोडते. धेमाजी या गावापासुनाचे जवळचे विमानतळ हे ६६ किलोमीटरवर लखीमपुरच्या जवळ लीलाबारी विमानतळ हे आहे. धेमाजी आणि दिब्रुगड ही दोन गावे ‘बोगीबील ब्रिज’ या नावाच्या एका पुलाने जोडलेली आहेत. या पुलावरून रेल्वे तसेच रस्त्यावरूनही वाह्तुक होते.

धेमाजी हे ठिकाण आता अधिक प्रसिद्धीस आले ते येथे उभारल्या गेलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या-४.६ किमी लांबीच्या रेल्वे पुलामुळे. हा पूल धेमाजी आणि दिब्रुगड ही दोन गावे जोडतो. हा पूल बोगीबील हा येथे उभारला आहे. त्यावर तीन पदरी रस्ता बांधला गेला आहे. या पुलाचे बांधकाम २१ एप्रिल २००२ साली सुृ होऊन असून डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन २५ डिसेंबर २०१८ रोजी झाले. या ठिकाणी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात.

बोगीबील ब्रिज

शिक्षण

[संपादन]

धेमाजी या गावात अनेक शाळामहाविद्यालये आहेत. त्यांपैकी काही म्हणजे केंद्रीय विद्यालय, धेमाजी कॉलेजेस, जवाहर नवोदय विद्यालय धेमाजी, इत्यादी आहेत. धेमाजी येथे विवेकानंद केंद्रालयाच्याही काही शाळा आहेत. धेमाजी या गावात सर्व माध्यमांचे शिक्षण मिळते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "dhemaji district site". २९ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ देशपांडे, शामला (२२ एप्रिल २०१९). "पहिल्या दर्शनाने प्रेमात पडणारे धेमाजी". माझा पेपर. २९ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.