Jump to content

निजामाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निझामाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?निजामाबाद
निजामाबाद
तेलुगू : నిజామాబాద్
तेलंगणा • भारत
—  महानगर  —
वरून घड्याळाच्या दिशेने: जिल्हा सरकारी रुग्णालय, निझामाबाद जंक्शन रेल्वे स्थानक, जिल्हा न्यायालय आणि निझामाबाद किल्ला
वरून घड्याळाच्या दिशेने: जिल्हा सरकारी रुग्णालय, निझामाबाद जंक्शन रेल्वे स्थानक, जिल्हा न्यायालय आणि निझामाबाद किल्ला
वरून घड्याळाच्या दिशेने: जिल्हा सरकारी रुग्णालय, निझामाबाद जंक्शन रेल्वे स्थानक, जिल्हा न्यायालय आणि निझामाबाद किल्ला
Map

१८° ४०′ १९.१९″ N, ७८° ०५′ ३८.४″ E

निजामाबाद is located in तेलंगणा
निजामाबाद
निजामाबाद
निजामाबादचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°40′19″N 78°5′38″E / 18.67194°N 78.09389°E / 18.67194; 78.09389

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४२.९० चौ. किमी
• ८२ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
उष्णकटिबंधीय सवाना (Köppen)
• १,०४५.७ मिमी (४१.१७ इंच)

• ३४.० °C (९३ °F)
• २१.० °C (७० °F)
प्रांत तेलंगणा
जिल्हा निजामाबाद जिल्हा
लोकसंख्या
घनता
साक्षरता
३,१०,४६७
• ७,२३७/किमी
८०.३१ %
भाषा तेलुगू
स्थापना १९०५
संसदीय मतदारसंघ निजामाबाद
विधानसभा मतदारसंघ निजामाबाद शहर, निजामाबाद ग्रामीण
स्थानिक प्रशासकीय संस्था निजामाबाद महानगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ५०३००१, ५०३००२, ५०३००३, ५०३१८६, ५०३२३०
• +०८४६२
• IN- NZB
• TS-16[१]
संकेतस्थळ: निजामाबाद महानगरपालिका

निजामाबाद (Nizamabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. निजामाबाद शहर तेलंगणाच्या वायव्य भागात तेलंगणा-महाराष्ट्र सीमेजवळ वसले असून ते हैदराबादच्या १७५ किमी उत्तरेस तर नांदेडच्या ११० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली निजामाबादची लोकसंख्या सुमारे ३.१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (हैदराबादवरंगल खालोखाल). २०१४ सालापूर्वी निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता.

निजामाबादची स्थापना १९०५ साली निजामाने केली. आजच्या घडीला निजामाबाद उत्तर तेलंगणामधील एक प्रमुख शहर आहे. या जिल्ह्याचे नाव निजामाबाद (निजाम-ए-अबादी) हे हैदराबादच्या निजाम असफ जाही, सहावा याच्या नावावरून पडले, ज्याने १८ व्या शतकात दख्खनवर राज्य केले होते, मूळतः जिल्याला इंदूर असे म्हणतात, जे राजा इंद्रदत्त याच्या नावावरून प्रचलित होते ज्याने ५ व्या शतकात या प्रदेशावर राज्य केले. निजाम म्हणजे निजाम, हैदराबाद राज्याचा राज्यपाल (साम्राज्याचा) आणि आबाद म्हणजे 'चिरायु'.[२]

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ३,१०,४६७ होती. एकूण लोकसंख्येमध्ये १,५५,१६३ पुरुष आणि १५५,३०४ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे १००१ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ३४,२५६ मुले आहेत, त्यात १७,४०८ मुले तर १६,८४८ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९६८ मुली आहे. २२१,८२९ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८०.३१% होता.[३]

५९.७७% लोक हिंदू आणि (३८.०१%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.१३%), शीख (०.२३%), बौद्ध (०.३५%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.४८%) यांचा समावेश होतो.[४]

शहरात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा तेलगू (५६.८%) आणि उर्दू (३५.६%) आहेत आणि त्या अधिकृत भाषा देखील आहेत. जवळपास ४.२% लोक मराठी बोलतात.[५]

भुगोल[संपादन]

निजामाबाद हे उत्तर अक्षांशाच्या १८°४०′१९.१९″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°०५′३८.४″E वर स्थित आहे. निजामाबादची सरासरी उंची ८२ मीटर आहे. [६]

हे शहर किनाऱ्यापासून बऱ्यापैकी अंतरावर वसलेले असल्याने, हवामान उष्णकटिबंधीय सवाना आहे आणि जून ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस पडतो. हिवाळ्यात तापमान ५ °C (४१ °F) इतके कमी होते तर सरासरी १८ °C (६४ °F) असते, तर उन्हाळ्यात तापमान ४७ °C (११७ °F) पर्यंत वाढते आणि सरासरी ४६ °C (११५ °F) राहते. सरासरी वार्षिक तापमान २७ °C (८१ °F) असते. [७] वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०४५.७ मिलिमीटर (४१.१७ इंच) आहे.[८]

पर्यटन[संपादन]

 • निझामाबाद किल्ला हा शहराच्या नैऋत्येस स्थित आहे जो राष्ट्रकूट राजांनी १० व्या शतकात बांधला होता, हा किल्ला हैदराबादचे निजाम असफ जाहींनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी किल्ला पुन्हा बांधला.
 • पुरातत्त्व आणि वारसा संग्रहालय - संग्रहालयात पुरातन पाषाणापासून विजयनगर साम्राज्यापर्यंत मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध कलाकृती आणि पुरातन वास्तू ठेवल्या आहेत.
 • अलीसागर उद्यान
 • अशोक सागर हे तलाव, उद्यान आणि प्रेक्षणीय स्थळ जनकमपेठ परिसरात वसलेले आहे.

संस्कृती[संपादन]

निजामाबादच्या संस्कृतीवर निजामांचा प्रभाव दिसतो. या शहराची संस्कृती वैविध्यपूर्ण आहे आणि शहरातील लोकसंख्येचे मोठे प्रमाण हिंदू आणि मुस्लिम आहेत आणि धर्मांच्या या मिश्रणामुळे निजामाबादमध्ये हिंदू परंपरेची गणेश चतुर्थी आणि दिवाळी आणि मुस्लिमांकडून ईद उल-फित्र, मावळीद आणि ईद उल असे अनेक सण साजरे केले जातात.

तेलुगू आणि उर्दू या शहरातील लोक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा आहेत, इंग्रजी देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

निजामाबादी पाककृतीमध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू आणि मांसाचे पदार्थ असतात. डोसा, वडा, पुरी आणि इडली यांचा समावेश असलेले दक्षिण भारतीय पदार्थ हे सामान्य न्याहारीचे पदार्थ आहेत. मुघलाई आणि अरब प्रभाव आणि ताहारी यांचे मिश्रण असलेली हैदराबादी बिर्याणी हे इतर पदार्थ आहेत.

प्रशासन[संपादन]

१९३७ मध्ये निजामाबाद नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. २००५ मध्ये हीचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र ४२.९ किमी (१६.६ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ६० प्रभाग आहेत.[९] निजामाबाद हे शहर दोन मतदारसंघात विभागले आहे निजामाबाद शहर आणि निजामाबाद ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. जे निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतात.[१०]

वाहतूक[संपादन]

निजामाबाद येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[११] राष्ट्रीय महामार्ग ४४ शहराला बायपास करतो, जो उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.[१२] ४६० किमी (२९० मैल) लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ६३, निजामाबाद येथून उगम पावतो आणि छत्तीसगडच्या जगदलपूरला जोडतो.[१३]

निजामाबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असून ते मनमाड-सिकंदराबाद रेल्वेमार्गावर स्थित आहे.[१४]

शिक्षण[संपादन]

निजामाबाद हे तेलंगणातील प्रमुख शिक्षण केंद्र आहे.

हे देखाल पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
 2. ^ "About Nizamabad".
 3. ^ "१ लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे" (PDF).
 4. ^ "Nizamabad City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
 5. ^ "मातृभाषेनुसार लोकसंख्या - शहर पातळी".
 6. ^ "Nizamabad topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
 7. ^ "Nizamabad climate: Average Temperature, weather by month, Nizamabad weather averages - Climate-Data.org". en.climate-data.org. 2022-02-09 रोजी पाहिले.
 8. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
 9. ^ "निजामाबाद महानगरपालिका".
 10. ^ "PUBLIC REPRESENTATIVES | Nizamabad District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
 11. ^ "TSRTC". www.tsrtc.telangana.gov.in. 2022-02-09 रोजी पाहिले.
 12. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2016-02-01. 2022-02-09 रोजी पाहिले.
 13. ^ "LIST OF NATIONAL HIGHWAYS Telangana". Archived from the original on 2022-02-09. 2022-02-09 रोजी पाहिले.
 14. ^ Pulloor, Narender (2016-03-29). "Nizamabad rail station to get junction status". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.