गुंटकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुंटकल भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२६,६५८ होती. गुंटकल रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाला इतर ३ लहान मार्ग जुळतात. ज्यावेळी पुणे-मिरज बंगलोर ही रेल्वे लाईन मीटर गेजची होती, त्यावेळीही पुण्याहून मद्रासला जाणाऱ्या रेल्वे लाईनवरील गुंटकल या जंक्शनाद्वारे गाडी बदलून बंगलोरला जाता येत असे. आता पुण्याहून बंगलोरला जाण्यासाठी एकूण १९ रेल्वे गाड्या आहेत, त्यांतील ८ गुंटकलमार्गे जातात.