Jump to content

व.दि. कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. वसंत दिगंबर कुलकर्णी (?-निधन : २५ आॅगस्ट २००१) हे मराठी समीक्षक व संतसाहित्याचे अभ्यासक होते. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. हैदराबादच्या दक्षिण भारतातील मराठी साहित्य संशोधन संस्थेतही ते काही काळ प्राध्यापक होते. लेखिका आणि प्रकाशक कविता निरगुडकर या वदिंच्या कन्या आहेत. 'हिमदंशातून पुनर्जन्म' हे त्यांचे पुस्तक आणि त्याचा इंग्रजी अनुवाद खूप गाजला.

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन साहित्यिकांना डॉ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एक स्मृ्ति गौरव पुरस्कार देण्यात येतो. साहित्यिकांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याची या पुरस्काराची परंपरा आहे.

व.दि. कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अमृतानुभवाच्या वाटेने...
  • अज्ञात लीळा
  • आणखी काही… प्रस्तावना
  • काव्य आणि काव्यास्वाद
  • गोदातटीचा अश्वत्थ
  • श्री गोविंदप्रभू चरित्र
  • नाटक रंगाविष्कार आणि रंगस्वाद
  • निवांत निवृत्ती
  • पसायदान
  • पोएट बोरकर
  • प्रकाशाची अक्षरे
  • प्रस्तावना
  • Blossoms Redefined (इंग्रजी)
  • मराठी साहित्य : विमर्श आणि विमर्शक
  • विज्ञानसाहित्य आणि संकल्पना (सहलेखक - निरंजन घाटे)
  • सरस्वतीच्या सान्निध्यात
  • संगीत सौभद्र (संपादन)
  • संगीत सौभद्र : घटना व स्वरूप
  • सुमित्रा - संवाद
  • स्थानपोथी (स्थलवर्णन)
  • हरिपाठ - अंतरंगदर्शन
  • हैदराबादची मराठी हस्तलिखिते (सहसंपादक - डॉ. श्री.रं.कुलकर्णी, प्रा. द.पं.जोशी)
  • श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी
  • ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतिकथा

पुरस्कार

[संपादन]