Jump to content

"ज्ञानेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७९: ओळ ७९:
* [[अमृतानुभव]] (पंडित सातवळेकर)
* [[अमृतानुभव]] (पंडित सातवळेकर)
* अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
* अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
* आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
* संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
* संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
* संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - ([[विंदा करंदीकर]])
* संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - ([[विंदा करंदीकर]])
* अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
* अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
* The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
* इंद्रायणीकाठी (कादंबरी, [[रवींद्र भट]])
* इंद्रायणीकाठी (कादंबरी, [[रवींद्र भट]])
* The Genius of Dnyaneshvar ([[रवित थत्ते]])
* The Genius of Dnyaneshvar ([[रवित थत्ते]])
* ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
* दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
* भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.[[शं.वा. दांडेकर]])
* भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.[[शं.वा. दांडेकर]])
* महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. [[शं.दा. पेंडसे]])
* महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. [[शं.दा. पेंडसे]])
* माणूस नावाचे जगणे ([[रविन थत्ते|रविन लक्ष्मण थत्ते]])
* माणूस नावाचे जगणे ([[रविन थत्ते|रविन लक्ष्मण थत्ते]])
* मी [[हिंदू]] झालो ([[रविन थत्ते]])
* मी [[हिंदू]] झालो ([[रविन थत्ते]])
* मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
* येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
* येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
* संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
* संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
* संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
* सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास )
* ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
* ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
* श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
* ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
* ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
* ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
* ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
* श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
* (वि)ज्ञानेश्वरी ([[रविन थत्ते]], मृणालिनी चितळे)
* (वि)ज्ञानेश्वरी ([[रविन थत्ते]], मृणालिनी चितळे)
* ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी ([[विनोबा भावे]])
* ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी ([[विनोबा भावे]])
* ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देश्समाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
* ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
* ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
* श्रीज्ञानेश्वर चरित्र ([[ल.रा. पांगारकर]])
* श्रीज्ञानेश्वर चरित्र ([[ल.रा. पांगारकर]])
ओळ ९९: ओळ १११:
* ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. [[श्रीपाल सबनीस]])
* ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. [[श्रीपाल सबनीस]])
* ज्ञानेश्वर नीति कथा ([[वि.का. राजवाडे]])
* ज्ञानेश्वर नीति कथा ([[वि.का. राजवाडे]])
* श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र (तात्या नेमिनाथ पांगळ)
* ज्ञानेश्वर माऊली (दत्ता ससे)
* ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
* ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
* ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
* ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
* ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
* ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
* ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा - एक अभ्यास (प्रा. भावे, प्रा. दाते; मेहता प्रकाशन)
* ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा - एक अभ्यास (प्रा. भावे, प्रा. दाते; मेहता प्रकाशन)
* श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा (प्रा. ह.शे. टेकाळे)
* ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. [[व.दि. कुलकर्णी]]) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
* ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. [[व.दि. कुलकर्णी]]) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
* ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड) - [[रविन थत्ते|रविन मायदेव थत्ते]]
* ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड) - [[रविन थत्ते|रविन मायदेव थत्ते]]

२२:५२, ४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

संत

संत ज्ञानेश्वर

मूळ नाव ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म इ.स. १२७५ श्रावण कृ. ८, शके११९७
आपेगाव,महाराष्ट्र
निर्वाण २५ ऑक्टोबर, इ.स.१२९६ कार्तिक कृ.१३, शके १२१८
आळंदी, महाराष्ट्र
समाधिमंदिर आळंदी
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय
गुरू निवृत्तीनाथ
शिष्य विसोबा खेचर, योगी चांगदेव, सच्चिदानंद बाबा, इ.
भाषा मराठी भाषा
साहित्यरचना ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), चांगदेवपासष्टी,अमृतानुभव, हरिपाठ, अभंग,इ.
संबंधित तीर्थक्षेत्रे आळंदी, नेवासे,आळेफाटा,पैठण.
वडील विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी
आई रुक्मिणी बाई
विशेष माहिती ज्ञानेश्वरांची भावंडे - निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई

संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२९६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगीतत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टीहरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना होय. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.

बालपण

(१२७१ किंवा १२७५– १२९६). महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बापविठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात; परंतु ⇨ नामदेव, ⇨ मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानमुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानमुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. []

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.

भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

ज्ञानेश्वरांचे कार्य

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

चांगदेवांचे गर्वहरण

अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला.

संजीवन समाधी

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपानमुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ

ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तके

  • अमृतानुभव (रा.ब. रानडे)
  • अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
  • अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
  • आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
  • संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
  • संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - (विंदा करंदीकर)
  • अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
  • The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
  • इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
  • The Genius of Dnyaneshvar (रवित थत्ते)
  • ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
  • दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
  • भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.शं.वा. दांडेकर)
  • महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं.दा. पेंडसे)
  • माणूस नावाचे जगणे (रविन लक्ष्मण थत्ते)
  • मी हिंदू झालो (रविन थत्ते)
  • मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
  • येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
  • संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
  • संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
  • संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
  • सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास )
  • ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
  • श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
  • ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
  • ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
  • श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
  • (वि)ज्ञानेश्वरी (रविन थत्ते, मृणालिनी चितळे)
  • ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी (विनोबा भावे)
  • ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देश्समाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
  • ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
  • श्रीज्ञानेश्वर चरित्र (ल.रा. पांगारकर)
  • श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी (व्याख्यानसंग्रह, व्याख्याते लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - ढवळे प्रकाशन
  • ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • ज्ञानेश्वर नीति कथा (वि.का. राजवाडे)
  • श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र (तात्या नेमिनाथ पांगळ)
  • ज्ञानेश्वर माऊली (दत्ता ससे)
  • ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
  • ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
  • ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा - एक अभ्यास (प्रा. भावे, प्रा. दाते; मेहता प्रकाशन)
  • श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा (प्रा. ह.शे. टेकाळे)
  • ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
  • ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड) - रविन मायदेव थत्ते
  • ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार (रामचंद्र नारायण वेलिंगकर)
  • ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान (डॉ. शं.दा. पेंडसे)
  • ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (वि.का. राजवाडे)
  • ज्ञानेश्वरीतील माणिक मोती (वामन गो. नातू)
  • ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती डॉ. (रा.शं. वाळिंबे)
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (म.वा. धोंड)
  • ज्ञानेश्वरी दर्शन (प्रा. रा.श्री. जोग)
  • ज्ञानेश्वरी सर्वस्व (न.चिं.केळकर)

चित्रपट

  • ज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
  • संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४मध्ये बनला होता.

स्मारके

  • अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे संत ज्ञानेश्वर नावाची शाळा आहे.
  • आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालविलेले ज्ञानेश्वर विद्यालय आहे. ही प्रशाला भावी कीर्तनकार, प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी ’श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ची वेद शाळा आहे.
  • गोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा आहे.
  • संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव
  • श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे
  • संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर (सांगली जिल्हा)
  • एम‌आयटी संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (पुणे)

हेही पहा

विकिस्रोत
विकिस्रोत
ज्ञानेश्वर हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

very happy to see this

संदर्भ

  1. ^ http://www.hindupedia.com/en/Sant_Dnyaneshwar. जुलै १२ रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे