चांगदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The siblings Muktabai, Sopan, Dnyaneshwar and Nivruttinath seated on the flying wall greet Changdev seated on a tiger. In the centre, Changdev bows to Dnyaneshwar.

चांगदेव महाराष्ट्रातील संत होते.  हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. एकदा यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची किर्ती आली तेव्हा त्यांना भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करुन त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. निवृत्तीनाथांनी ओळखले की योगी असूनही आत्मज्ञानाची कमतरता आहे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. त्यानंतर मुक्ताबाई यांना योगी चांगदेव यांनी गुरु मानले. सन १३०५ (शके १२२७) मध्ये यांनी समाधी घेतली.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.