प्रभात फिल्म कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभात फिल्म कंपनी

प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातीलभारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णूपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून इ.स. १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. इ.स. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. इ.स. १९२९ ते इ.स. १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे इ.स. १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली.

२१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.

अयोध्येचा राजा या इ.स. १९३२ साली पडद्यावर झळकलेल्या, प्रभात-निर्मित पहिल्या मराठी बोलपटातील प्रसंग

बाह्य दुवे[संपादन]