Jump to content

आपेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ज्ञानेश्वरांची 3 भावंडे आहेत. सर्वात मोठा निवृत्तीनाथ तर सोपान आणि मुक्ता की लहान आहेत. ज्ञानेश्वर चे वडील विठ्ठलपंत काही वर्षासाठी तीर्थयात्रेला गेले होते तेच ते आळंदी या ठिकाणी थांबले यादरम्यान आपेगाव येथे आपल्या कुटुंबासोबत राहत असलेले ज्ञानेश्वर यांना लोक सन्याशाची पोर म्हणून छळत असे. त्यांना गावातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपेगाव आणि तसेच महाराष्ट्रातील मोठ्या अंतरापर्यंत पुरोगामी ब्राम्हणांचे वर्चस्व होते तसेच जातीभेद उंबरठयावर होते.