रेवणनाथ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रेवणनाथ हे एक नाथ संप्रदायामधील एक सिद्ध होते.
समाधिस्थळ
[संपादन]महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर(विटा)तालुक्यातील रेणावी या गावात रेवणनाथ (रेवणसिद्ध) महाराजांची समाधी आहे.
कथा
[संपादन]रेवणनाथ जन्मकथ
[संपादन]ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी अठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले. त्याच वेळी जे थोडेसे वीर्य पृथ्वीवर, रेवानदीच्या तीरावर पडले, त्यामध्ये चमसनारायणांनी प्रवेश केला. त्यातून एक तेजस्वी मूल निर्माण झाला. ते मूल सूर्याप्रमाणे दैदीप्यमान दिसू लागले. प्रगट होताच ते मूल जोरजोराने रडू लागले.
त्या वेळी सहन सारुख नावाचा एक कुणबी पाणी आणण्यासाठी नदीवर गेला होता. त्याने ते मूल वाळूवर रडत पडलेले पाहिले. त्याचे हृदय द्रवले. त्याने ते मूल उचलून घरी आणले आणि आपल्या पत्नीला सांगितले की, “रेवातीरी वाळवंटावर मला एक मुलगा सापडला आहे.” तिने आनंदाने त्या बालकाला स्नान घालून आपल्या पाळण्यात ठेवले आणि आपल्या स्वतःच्या मुलासोबत झोपवले.
ते दिव्य बालक रेवातीरी सापडले होते, म्हणून त्या बालकाचे नाव ‘रेवणनाथ’ ठेवण्यात आले. ते दिव्य बालक मोठे झाल्यावर आपल्या वडिलांसोबत शेतात जाऊ लागले. बाराव्या वर्षी रेवणनाथ शेतीकामात खूपच हुशार झाले.
एके दिवशी रेवणनाथ पहाटे उठून बैलांना चारण्यासाठी रानात घेऊन जात होते. आकाश ही स्वच्छ आणि आकाशात चांदण्या होत्या तेवढ्यात दत्तात्रेयांची स्वारी पुढे आली. दत्तात्रेय गिरिनार पर्वतावर जाणार होते. त्यांच्या पायात खडावा होते, शरीरावर कौपीन, वाढलेल्या जटा आणि पिंगटवर्णाची दाढी-मिशी होती — असा तिन्ही देवांचा अवतार येऊन रेवणनाथास भेटले.
दत्तात्रेयांना पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आणि रेवणनाथांना आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. रेवणनाथ मनोमन म्हणाले — “मी कोण होतो, आता कोण आहे, आणि अशा अज्ञानात का पडलो आहे?” रेवणनाथांना खेद वाटू लागले.
दत्तात्रेयांनी विचारले, “तू कोण आहेस?” तेव्हा रेवणनाथ म्हणाले, “तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत. त्यात जो सत्त्वगुणी महापुरुष आहे, तो मीच आहे. पण आता या देहात मला अनेक कष्ट भोगावे लागत आहेत. कृपा करून मला मुक्त करा.”
हे बोलून त्यांनी दत्तात्रेयांच्या पायांवर मस्तक ठेवले. रेवणनाथांचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयांनी वरदहस्त रेवणनाथांच्या मस्तकावर ठेवला.
दत्तात्रेयांना माहिती होते की हा रेवणनाथ म्हणजेच नऊनारायणांच्या अवतारांपैकी चमसनारायणाचा अवतार आहे. काहींना वाटेल की दत्तात्रेयांनी त्यावेळी रेवननाथांना पूर्ण अनुग्रह का दिला नाही? पण कारण असे होते की, भक्तीमार्गाची प्रवृत्ती झाल्याशिवाय अनुग्रहाचा उपयोग होत नाही. म्हणून दत्तात्रेयांनी मनोमन ठरवले — “हा भक्तीच्या मार्गावर लागला की त्याला ज्ञान आणि वैराग्य सहज प्राप्त होईल.”
म्हणून त्यांनी रेवणनाथांना फक्त एक सिद्धी प्रधान केली. रेवणनाथाला त्या ज्ञानाने परम आनंद झाला. रेवणनाथांनी दत्तात्रेयांच्या पायांवर लोटांगण घातले. त्यानंतर दत्तात्रेय तेथून निघून गेले.
रेवणनाथास एक सिद्धी प्राप्त झाली, आणि त्या प्राप्तीवर ते समाधानी राहिले आणि पुढे तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त करून घेतले.
| नवनाथ |
|---|
| मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तृहरि • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ |