गोविंदप्रभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोविंद प्रभू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ, (अन्य नावे: श्री प्रभू ;) हे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचे ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.

गोविंदप्रभू चरित्रलीळा[संपादन]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत [ संदर्भ हवा ]. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले [ संदर्भ हवा ]. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता [ संदर्भ हवा ]. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.[१]

स्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन[संपादन]

स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवणी स्वीकारू' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केले आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. [ संदर्भ हवा ].

केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही.

वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.[२]

संदर्भयादी[संपादन]

  1. डॉ. यू.म. पठाण (२३ सप्टेंबर, इ.स. २००९). "श्री गोविंद प्रभू [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले.  Unknown parameter |qXeZ72qKNigwQ= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. डॉ. यू.म. पठाण (२३ सप्टेंबर, इ.स. २००९). "श्री गोविंद प्रभू [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (मराठी मजकूर). १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले.  Unknown parameter |qXeZ72qKNigwQ= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)