निळोबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ इ.स.च्या १७ व्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शा.श. १५८० (इ.स. १६५८) सालाच्या सुमारास विद्यमान होते[१].ते प्रतिवर्षी नाथषष्थी ला पैथनच्या वारीस येत. त्यांनी तुकारामांना गुरुस्थानी मानले होते.

त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले व त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी.

बाह्य दुवे[संपादन]

  1. महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर