केशव विष्णू बेलसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
के. वि. बेलसरे
Kvbelsare.jpg
के.वि. बेलसरे
मूळ नाव केशव विष्णू बेलसरे
जन्म ८ फेब्रुवारी
सिकंदराबाद (आंध्र प्रदेश)
निर्वाण ३ जानेवारी १९९८
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा मराठी
संबंधित तीर्थक्षेत्रे गोंदवले
व्यवसाय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
(सिद्धार्थ कॉलेज, मुंबई)
वडील विष्णू
पत्नी इंदिरा
अपत्ये प्रा. श्रीपाद बेलसरे


प्रा. के. वि. बेलसरे: (केशव विष्णू बेलसरे तथा 'बाबा बेलसरे')
( ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.


के. वि. बेलसरे यांची ग्रंथरचना[संपादन]

  • अंतर्यात्रा
  • आनंद साधना (आध्यात्मिक आत्मचरित्र)
  • उपनिषदांचा अभ्यास
  • चैतन्यसुधा समाधान पर्व
  • भावार्थ भागवत
  • शरणागती
  • श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (चरित्र आणि वाङ्मय)
  • संतांचे आत्मचरित्र
  • साधकांसाठी संतकथा
  • सार्थ श्रीदासबोध

कै. के. वि. बेलसरे यांनी सांगितलेला श्रीमहाराजांचा निरोप[संपादन]

हाचि सुबोध श्रीगुरूंचा
नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥

यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥

आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥

दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥

स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥

अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥

राज्याधिकार, किंवा जावो समस्त धन मान ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥

प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।
हाचि सुबोध श्रीगुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥