इस्लामपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उरण-इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असून, उरण-इस्लामपूर नगरपालिकेची स्थापना दि. १६-११-१८५३ रोजी झालेली आहे. सन २००१ चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५८३३० इतकी आहे. उरण-इस्लामपूर नगरपालिका ही " ब" वर्ग नगरपालिका आहे. उरण-इस्लामपूर शहराचे क्षेत्र ४०४२ हेक्टर इतके आहे.

नगरपालिका हद्दीत एकूण २६ वार्ड असून त्यामधून २६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच नगरपालिकेत ३ नामनिर्देशित सदस्य आहेत. शहराचे पश्चिम हद्दीपासून पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा सर्वसाधारणपणे २.५ किलोमीटर असून, पेठ-सांगली राज्य मार्ग क्र. १३८ हा शहरातून जातो.

शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे १) ७ लाख २) ७.५ लाख ३) ७.५ लाख लिटर्स क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांना ११ किलोमीतर अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पाणी पुरविले जाते. उरण-इस्लामपूर नगरपरिषद ही वाटर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी करणारी राज्यातील कदाचित एकमेव नगरपरिषद आहे.या गावापासून १० कि.मी अंतरावर नरसिंगपूर आहे.