पेरियाळ्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेरियाळ्वार (तमिळ: பெரியாழ்வார் ; रोमन लिपी: Periyalvar) (जीवनकाळ: इ.स.चे ६ वे शतक अथवा इ.स.चे ९ वे शतक) हा तमिळ संतकवी होता. तो वैष्णव आळ्वारांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म तमिळनाडूतील श्रीविल्लीपुत्तूर गावी एका ब्राह्मण घराण्यात झाला. त्याचे जन्मनाव विष्णूचित्तार असे होते. त्याने ४,००० दिव्यप्रबंधांतील पेरियाळ्वार तिरुमोळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही रचना रचल्या. आळ्वारांपैकी एकमेव महिला आळ्वार असलेल्या आंडाळीचा तो मानलेला वडील होता.