कीर्तनकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लिम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.

प्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.[ संदर्भ हवा ]

पर्यावरण आणि कीर्तनकार[संपादन]

’संत वाङ्‌मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्‌मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत.

वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी[संपादन]

जुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :-

कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था[संपादन]

  • जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची : स्थापना इ.स. १९१७
  • अखिल भारतीय कीर्तन संस्था, विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई)
  • नारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा
  • श्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड)
  • ॐ तत्त्वमसि प्रतिष्ठानद्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय)
  • श्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे

महाराष्ट्रातील काही कीर्तनकार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]