सांगली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हा लेख सांगली शहराविषयी आहे. सांगली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?सांगली

महाराष्ट्र • भारत
—  महानगर  —
WCE Sangli Shilp Chintamani.jpg

१६° ५२′ ००″ N, ७४° ३४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ११८.१८ चौ. किमी
जिल्हा सांगली जिल्हा
लोकसंख्या
घनता
५,१३,८६२ (२०११)
• ४,३४८/किमी (पहिल्या महापौर = शैलजा नवलाई)
महापौर दिग्विजय सूर्यवंशी
उपमहापौर उमेश पाटील
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 416416
• +०२३३
• MH-10, MH-60
संकेतस्थळ: सांगली o संकेतस्थळ

सांगली Sangli.ogg उच्चार हे महानगर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे.

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंत पटवर्धनराजे हे करतात.

सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णूदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानाचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानामध्ये ('सीतास्वयंवर)' ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णूदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला ("नाट्यपंढरी") ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे.

सांगली शहर हे पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने तसेच बिजली मल्ल या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाणारे माजी आमदार कै. संभाजी पवार हेही याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह कुंडल, पलूस, शिराळा, वाळवा, मिरज, कोल्हापूर ह्या ठिकाणी ही कुस्तीला प्राधान्य दिलं जातं. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात .

सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा द्राक्षाच्या उत्पादनासाठी तसेच निर्यातीसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. मुख्य पिके ऊस, डाळींब, द्राक्ष ही सुद्धा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मराठी कवी, गीतकार व संगीतकार ग.दि. माडगूळकर हे याच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माडगुळ गावचे.

भडंग (एक प्रकारचे चुरमुरे), वडापाव आणि मिसळपाव हे सांगलीकरांचे आवडते खाद्यपदार्थ आहेत.

नाव[संपादन]

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात : १) गांव भाग २) पेठ भाग ३) गवळी गल्ली ४) चांभार वाडा ५) वखार भाग ६) जांभवाडी सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. या सहा गल्ल्या गावभागातील हरिदास गल्ली, वैद्य गल्ली, जोशी गल्ली, फडणीस गल्ली, खाडिलकर गल्ली अशा क्रमाने शहरच्या आराखड्यात दाखविण्यात आल्या आहेत. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.

ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे?)
हेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.

सांगली हे मुंबई पासून ३९० किमी व बंगलोरपासून ७०० किमी आणि कोल्हापूर पासून ५० किमी अंतरावरील एक प्रमुख शहर आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हळद व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात आघाडीवर आहे. सांगली एक प्रमुख शिक्षण आणि आरोग्य केंद्र देखील आहे. विष्णूदास भावे ह्यांचं पहिलं नाटक एकंदरीत, महाराष्ट्रातील पहिलं नाटक सीता स्वयंवर हे येथील पटवर्धन संस्थानच्या राजवाड्यात प्रथम इ. स. १८४२ साली सादर करण्यात आलं त्यामुळे नाट्यपंढरी अशी देखील सांगली शहराची ओळख आहे. सांगली जवळ कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यटन स्थळांची विविध ठिकाणे आहेत.

प्राचीन काळामध्ये, सांगलीचा प्रदेश कुंडल म्हणून ओळखला जात होता. या भागावर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याची राजधानी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, सांगली हे पटवर्धन राजघराण्यातील एक राज्य होते. १९४८मध्ये, सांगली भारताच्या प्रजासत्ताकामध्ये विलीन करण्यात आले. सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे. येथे साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील प्रसिद्ध आहे.

सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत. नव्या दळणवळणाच्या माध्यमातून आणखी मोठे उद्योग शहरात आणि जिल्ह्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे.

येथे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. अभियंते, दूरसंचार सॉफ्टवेअर व्यावसायिक, आधुनिक दूरसंचार व इंटरनेट सुविधा आणि मोबाईल सेवा भरपूर प्रमाणात असल्याने सांगली हे माहिती तंत्रज्ञान उद्योग असणारे एक आकर्षक स्थान झाले आहे.

सांगलीमध्ये रुंद रस्ते, रेल्वे जंक्शन, सायबर कॅफे, मल्टि-खाद्यप्रकार, शिक्षणसुविधा, आरोग्य, दूरसंचार आणि मनोरंजन सुविधा, हॉटेल्स, मॉल्स वगैरे असल्याने ते एक आधुनिक शहर बनले आहे. शहराला जोडले जाणारे चार नवे महामार्ग विकासाच्या आधीन आहेत, त्यामुळे नव्या औद्योगिक प्रकल्पांसाठी ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील. सांगली शहर माहिती तंत्रज्ञान उत्कर्षाला आले आले आहे. शहरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क एकाच संकुलात उभारले आहे. सांगलीत भारतीय आणि परदेशी माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणखी एक सॉफ्टवेअर पार्क 'उभारण्याच्या प्रयत्नात आहे. या शहराजवळ हरिपूर हे गाव आहे. सांगली जवळ हरिपूर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध असून प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे स्थान आहे. सांगलीत नारळाची झाडे खूप आहेत.

इतिहास[संपादन]

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी (नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात

सांगली शहराचा इतिहास हा पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांच्या मिरजेतील जहागिरी मध्ये झालेल्या वाटणी नंतर सुरू होतो असे मानले जाते, परंतु त्यापूर्वीही सांगली या गावाचे अस्तित्व होते. तशा खुणा सांगलीतील गावभागात बघण्यास मिळतात. सांगली शहराचा व्यापारीदृष्ट्या विकास सन १९२९ साली आयर्विन पूलाच्या उभारणीनंतर सुरू झाला. आयर्विन पुलाला शंभरहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.

भूगोल[संपादन]

कृष्णाकाठची अतिशय सुपीक अशी जमीन सांगलीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला पिकवला जातो. ऊस व द्राक्षे इथे पिकतात. ज्वारी व बाजरी इथे बहरतात.तासगाव तालुक्यातील द्राक्षे व बेदाणे तर जगभर प्रसिद्ध आहेत.

पेठा[संपादन]

सांगली मिरज हे जुळे शहर म्हणुन ओळखले जाते. अमराई बाग( Garden ) फार सुंदर आहे. सध्या बापट मळा म्हणजेच महावीर उद्यान शहरवासीयांचे आवडते ठिकाण झाले आहे.

हवामान[संपादन]

माहिती हवामान तक्ता - सांगली
जाफेमामेजुजुनोडी
 
 
3.8
 
31
12
 
 
0.5
 
33
15
 
 
5.3
 
36
18
 
 
22.1
 
38
21
 
 
48.3
 
37
22
 
 
71.1
 
31
22
 
 
108.7
 
28
21
 
 
79.8
 
28
21
 
 
99.6
 
30
20
 
 
88.9
 
32
19
 
 
33.5
 
30
16
 
 
6.9
 
30
13
तापमान °C मध्ये पाउस मात्रा mm मध्ये
दुवा: Government of Maharashtra
इंपेरीयल कंव्हर्जन
जाफेमामेजुजुनोडी
 
 
0.1
 
88
54
 
 
0
 
91
59
 
 
0.2
 
97
64
 
 
0.9
 
100
70
 
 
1.9
 
99
72
 
 
2.8
 
88
72
 
 
4.3
 
82
70
 
 
3.1
 
82
70
 
 
3.9
 
86
68
 
 
3.5
 
90
66
 
 
1.3
 
86
61
 
 
0.3
 
86
55
तापमान °F मध्येपाउस मात्रा इंचेस मध्ये

जैवविविधता[संपादन]

सांगली परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे. कृष्णा नदी आणि लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृद्ध आहे.

अर्थकारण[संपादन]

सांगलीचे अर्थकारण मुळ व्यापार आहे. सबंध जिल्ह्यातून तसेच शेजारील जिल्ह्यातील व कर्नाटकातील काही भागाचा दैनंदिन व्यवहार सांगलीतूनच चालतो. येथील अर्थकारण व राजकारण यांचा मिलाप येथे दिसून येतो. येथील ऊस, द्राक्ष तसेच दूध याभोवती समाजकारण व त्याभोवती राजकारण फिरते. 

बाजारपेठ[संपादन]

सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष उत्पादनातही सांगली आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे. सांगली व तासगावची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे.

प्रशासन[संपादन]

नागरी प्रशासन[संपादन]

जिल्हा प्रशासन[संपादन]

अधिक माहितीसाठी पहा - http://sangli.nic.in/

वाहतूक व्यवस्था[संपादन]

सांगली रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे अनेक महालक्ष्मी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. रत्‍नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्‍नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो

लोकजीवन[संपादन]

सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात. सांगली शहरात ब-याच जातीचे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने वागत असतात.

संस्कृती[संपादन]

मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला.विष्णूदास भावे हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त अशी नाट्यगृहं उभारण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ] नाटकांमुळे कलाकारांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ] सांगलीचा गणपती खूप प्रसिद्ध आहे.

सांगलीकरांचा व सांगलीचा सर्वात चटकदार खाद्य पदार्थ म्हणजे भडंग व भेळ. सांगलीतील कपाले व भोरे भडंगाला खूप मागणी आहे. सांगली मधील क्रीडा क्षेत्रात नुकतेच मानाचे पान लिहिले गेले. भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी केली. या संघात सांगलीची स्मृती मानधना हिने चांगली कामगिरी बजावली. सांगली मधून चतुरंग अन्वय हा प्रसिद्ध दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. या अंकाने आत्तापर्यंत १५ वर्षात २४ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.[ संदर्भ हवा ]

प्रसारमाध्यमे[संपादन]

सांगलीची प्रसिद्ध अशी केबल आहे एस एम एस - सांगली मिडिया सर्विसेस, एस बी एन मराठी, सी न्यूज सांगली, जनप्रवास लाईव्ह तसेच लोकसंदेश न्यूज चॅनल जे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारण होत आहे, ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल अग्रभागी आहेत या सांगली शहरातुन बरेचसे वृत्तपत्रे प्रसीद्ध होतात. सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणीचे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.

शिक्षण[संपादन]

प्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]

सांगली शहरात अनेक नावाजलेल्य प्राथमिक शिक्षण संस्था आहेत

 • सांगली शिक्षण संस्था

सिटी हायस्कूल, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कुल, रामदयाल मालु हायस्कुल, कै.ग.रा. कन्यापुरोहित प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर ,सिटी इंग्लिश मिडीयम स्कूल, इत्यादी .

 • डेक्कन एजुकेशन सोसाइटी

सांगली हायस्कूल, आरवाडे हायस्कूल

महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]

 • वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (विश्रामबाग).
 • विलिंग्डन महाविद्यालय
 • लठ्ठे एज्यूकेशन सोसायटी
 • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
 • शांतिनिकेतन महाविद्यालय
 • भारती विद्यापीठ
 • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी
 • आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरींग
 • पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
 • चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स
 • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन
 • कस्तुरबाई वालचंद कॉलेज (के डब्लू सी)
 • गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स (जी.ए. कॉलेज)
 • राजारामबापू इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
 • पद्मभूषण वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय
 • मिरज मेडिकल कॉलेज
 • मथु बाई गरवारे महाविद्यालय
 • पतंगराव क़दम महाविद्यालय
 • मिरज महाविद्यायालय, मिरज

पर्यटन स्थळे[संपादन]

सांगलीतील पर्यटनस्थळे ही अगदी मोजकीच आहेत, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे अध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश होतो:

१) सांगली संस्थानचे गणपती मंदिर

२) सांगली शहर- आयर्विन ब्रिज आणि परिसर,

३)माई घाट परिसर, श्री स्वामी समर्थ घाट व परीसर

४) प्रतापसिंह राजे उद्यान

५) SFC मेगा मॉल & आमराई बाग

६) बागेतील गणपती मंदिर, हरिपूर

७) हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर आणि नदीकाठ परिसर

८) हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गाह, मिरज

९) दंडोबा डोंगर आणि मंदिर परिसर

१०) श्री गिरीलिंग मंदिर आणि परिसर

११) समर्थ रामदास स्थापित मारूती मंदिर आणि ३२ शिराळा परिसर

१२) रामलिंग बेट आणि समर्थ रामदास स्थापित बोरगावचा मारूती

१३) श्री श्री राधा गोपाल मंदिर- इस्कॉन आरवडे (तासगाव)

१४) श्री संस्थानचे गणपती मंदिर, तासगाव

१५) श्री क्षेत्र औदुंबर

१६) सागरेश्वर मंदिर आणि अभयारण्य परिसर-

१७) कोळे-नृसिंहपूर येथील श्री ज्वाला नृसिंह मंदिर

सागरेश्वर अभियारण्य[संपादन]

१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे.

कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत.

सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.

सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

१४) चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि धरण परिसर

 • सांगली शहराचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर पुढीलप्रमाणे आहे.
क्र ...पासून अंतर(कि.मी.)
औरंगाबाद ४५७
नागपूर ७६३
पुणे २३१
मुंबई ३९१
रत्‍नागिरी १७९

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]